News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
ग्रामविकासासाठी पंचसूत्री संकल्पना प्रभावी माध्यम असून सरपंच व गावकऱ्यांनी एकमेकांना समजून घेतल्यास गावाचा सर्वांगीण विकास होण्यास कोणीही रोखू शकत नाही.असे प्रतिपादन आदर्श गाव पाटोदाचे माजी सरपंच "भास्कर पेरे पाटील" यांनी केले.ते कोरपना येथे स्टुडंट्स फोरम गृपतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी माजी आमदार अॕड.संजय धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सैय्यद आबीद अली,भाजप तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, गडचांदूर न.प.नगरसेवक अरुण डोहे,विशाल गज्जलवार, कोरपना ठाणेदार सदाशिव ढाकणे,माजी नगरसेवक अमोल आसेकर आदींची मंचावर उपस्थिती होती.
पुढे बोलताना पेरे पाटील म्हणाले की,शुद्ध पाणी, स्वच्छता,आरोग्य,शिक्षण तसेच गावातील निराधार आणि वयस्कर नागरिकांचे पालनपोषण करावे. त्याचबरोबर ग्रामविकासासाठी सरपंच व गावकरी यांच्यातील परस्पर संबंध महत्वाचे असून विकासाच्या प्रक्रियेत दोघांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामविकासाच्या प्रक्रियेत सुरळीत करभरणा केल्यास गावच्या विकास प्रक्रियेत सरकारी निधी आणि करातील पैसे असे दुप्पटीने अर्थसहाय्य प्राप्त होऊन गावचा कायापालट होईल असे मोलाचे मार्गदर्शन पेरे पाटील यांनी केले.यावेळी स्टुडंट फोरम ग्रुपतर्फे डॉ.प्रवीण येरमे,डॉ.शारदा प्रवीण येरमे यांना कोरपना रत्न पुरस्कार,आदर्श शिक्षक परतेकी सर व समाजसेवक दिनेश राठोड जीवन "गौरव पुरस्कार" देण्यात आला. अनील देरकर यांनी प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सखोल माहिती प्रास्ताविकात दिली.तसेच स्टुडंट्स फोरम गृपतर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणार्यांना पेरे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.संचालन अविनाश पोईनकर यांनी केले.सदर सोहळ्यात नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
