News 34 chandrapur
चंद्रपूर - महावितरण चंद्रपूर परिमंडळात कार्यरत, महावितरण कर्मचारी कला व क्रिडा मंडळ व श्री. साई डिव्हाईन क्युअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर व्दारा महावितरण चंद्रपूर परिमंडळात एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन आज दि. ११ मे २०२२ रोजी करण्यात आले. मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यदायी जीवनाची कामना करीत या शिबिराच्या आयोजनाच्या सुचना केल्या त्यानुसार महावितरण कंपनीत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या संकल्पनेतून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. Health camp
या आरोग्य शिबिरात कर्मचाऱ्यांच्या रक्तशर्करेची, रक्तदाबाची, हदयगतीची ECG व अस्थिघनतेची BMD तपासणी करण्यात आली तसेच जनरल सर्जन डॉ. सरिता दुर्गे, अस्थिरोगतज्ञ डॉ. श्री. प्रसन्न मददीवार, नाक, कान, घसा रोगतज्ञ डॉ. श्री. सचिन बिलवाने, नेत्रतज्ञ डॉ. स्नेहल पोफळी जैन यांच्याव्दारे शिबिरात उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. Msedcl
या प्रसंगी अधिक्षक अभियंता, श्रीमती संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता, श्री. सुहास मेत्रे, कार्यकारी अभियंता, श्री. उदय फरासखानेवाला, सहा. महाव्यवस्थापक, श्री. सुशिल विखार, व उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी श्री. योगेश गोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महावितरण कर्मचारी कला व क्रिडा मंडळाचे श्री. योगेश गोरे, श्री. अमित बिरमवार, श्री. बंडू कुरेकर, तसेच सर्व सदस्य यांनी विषेश प्रयत्न केल. या आरोग्य शिबिराचा लाभ चंद्रपूर परिमंडळातील कर्मचाऱ्यांनी मोठया प्रमाणात घेतला.
