News 34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्र राज्यातील बंदिस्त हत्तींच्या उत्तम आरोग्यासाठी व व्यवस्थापनासाठी वनविभाग कटिबध्द आहे. याकरीता विविध तज्ञ व या क्षेत्रातील मान्यताप्राप्त अशासकीय संस्थांचा सहयोग घेण्यात येत आहे. ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ४ नर व २ मादी असे एकूण ६ हत्ती कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी हत्ती कॅम्पमध्ये ठेवण्यात आलेले होते. Elephants migrateयापूर्वी हत्ती कॅम्प हा मोहर्ली येथे होता. सदर सर्व हत्ती हे एकाच वंशावळीचे असल्यामुळे भविष्यात येणाऱ्या संततीमध्ये गंभीर स्वरुपाचे दोष उदभवण्याची शक्यता होती. वरील सर्व कारणांमूळे हत्तींना अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात आला व परिणाम स्वरुप महाराष्ट्र शासनाने हत्तींच्या पुढील जीवनकाळातील योग्य स्वास्थ्य व उच्च दर्जाच्या वैदयकीय देखरेखीसाठी प्रशिक्षित व अनुभवी पशुवैदयकीय अधिकारी यांचे मार्फत उपचाराची सोय व उत्तम आधुनिक सेवा सुनिश्चित करण्यासाठी, राहण्यासाठी प्रशस्त व भरपूर जागा असलेल्या जामनगर स्थित राधे क्रिष्ण टेंपल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट येथे या व्याघ्र प्रकल्पातील ६ हत्तींना स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात प्रोजेक्ट एलिफंट विभाग व केंद्रीय प्राणीसंग्रहालय, मंत्रालय, पर्यावरण, वने आणि हवामान बदल, भारत सरकार यांचेकडुन सुध्दा' नाहरकत' परवानगी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे मुख्य वन्यजीव रक्षक, गुजरात राज्य यांचेकडुन सुध्दा हत्तींचे स्थलांतरण करण्याबाबत 'नाहरकत' प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. तसेच राधे क्रिष्णा मंदीर एलिफंट वेलफेअर ट्रस्ट, जामनगर, (Radhe Krishna Temple Elephant Welfare Trust, Jamnagar) गुजरात यांनी सुध्दा सर्व हत्तींची आजीवन देखभाल करण्याबाबत सहमती दिलेली आहे. याअनुषंगाने या व्याघ्र प्रकल्पातून ६ हत्तींना स्थलांतरीत करण्यासाठी राधे क्रिष्णा मंदीर एलिफंट वेलफेअर ट्रस्ट यांचेकडुन पशुवैदयकीय अधिकारी व चमू तसेच महावत चंद्रपूर येथे पोहचले. आज दिनांक १ ९ / ०५ / २०२२ रोजी सकाळी ०६.०० वाजताच्या सुमारास या सर्व हत्तींना ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी हत्ती कॅम्पमधून नागपूर मार्गे अहमदाबाद - जामनगर येथे सहा वाहनांद्वारे स्थलांतरीत करण्यासाठी रवाना करण्यात आले. यानंतर ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाद्वारे कर्नाटक राज्यातून प्रशिक्षित हत्ती आणून सुसज्ज हत्ती पथक तयार करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. Tadoba national park
