चंद्रपूर - जिल्ह्यात आगीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या युबी कलेक्शन या कापड शोरूम ला 23 मे च्या रात्री भीषण आग लागली.
आगीची भीषणता बघता नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला पाचारण केले, सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याची मोहीम सुरू होती.
शहरातील कस्तुरबा मार्गावर स्थित युबी कलेक्शन हे कपड्याचे शोरूम आहे, सदर शोरूम हे 2 मजल्याचे आहे, रात्रीच्या सुमारास अचानक आगीने पेट घेत शोरूम मधील संपूर्ण कपडे जळून खाक झाले. Clothing store
या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती असून ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. Massive fire in chandrapur
आगीच्या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार घटनास्थळी पोहचले होते.
