चंद्रपूर - महाविकास आघाडी सरकारच्या ओबीसी विरोधी भूमिकेमुळे राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करण्यात आले.
Mahavikas aghadi
Mahavikas aghadi
यावेळी जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले व जिल्हाधिकारी यांचे सोबत चर्चा केली. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ मंगेश गुलवाडे, भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, भाजपा ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विनोद शेरकी, ओबीसी मोर्चा महिला महानगर जिल्हाध्यक्ष वंदना संतोषवार, भाजपा महामंत्री सुभाष कासनगोट्टुवार, राजू अडपेवार, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, मोहन चौधरी, शशिकांत मस्के, प्रदिप किरमे, शैलेश इंगोले, सौ सारीका संदुरकर, सौ अरुणा चैधरी, राम हरणे, जुम्मन रिजवी, रवि लोणकर, किशोर गोवारदिपे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना हंसराज अहीर म्हणाले की, मध्यप्रदेश सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत कोर्ट प्रकरणात सातत्य ठेवून प्रामाणिकता व इच्छाशक्तीने ओबीसींना यशस्वीपणे आरक्षण मिळवून दिले. त्याच धर्तीवर आघाडी सरकारने लवकरात लवकर एम्पेरीकल डाटा वर काम करुन ओबीसींना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. Obc political reservationएम्पेरीकल डाटा सुप्रिम कोर्टात सादर केल्यामुळेच मध्यप्रदेश सरकारला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका ओबीसी आरक्षणासहीत घेण्याचा आदेश सुप्रिम कोर्टाने दिला आहे. ओबीसी आरक्षणासंबंधी मुख्यमंत्राी शिवराज सिंह चौहान सरकारची प्रामाणिकता व इच्छाशक्ती तथा भाजपाची स्पष्ट भूमीका असल्यामुळेच मध्यप्रदेशात ओबीसींना राजकीय आरक्षण मिळविता आले असेही अहीर म्हणाले, आघाडी सरकारने आपली ओबीसी बद्दलची प्रामाणिकता दाखवावी व आवश्यक पडल्यास मध्यप्रदेश चे मुख्यमंत्राी शिवराज सिंह चौहान यांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला ही राज्यातील आघाडी सरकारला दिला. Obc reservation
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा घात करण्याचा प्रयत्न सदोदीत केला आहे. महाराष्ट्र सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे केलेले षडयंत्र असून ओबीसी विरोधी, नाकर्तेपणामुळेच महाराष्ट्रात ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. आघाडी सरकार ओबीसींबाबत उघडे पडले असल्याने त्यांनी हा डेटा तात्काळ गोळा करुन शक्य तेवढ्या लवकर उपलब्ध करुन ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा अन्यथा भाजपा संपूर्ण राज्यात मोठे आंदोलन छेडेल असेही अहीर म्हणाले. यावेळी सौ शालिनी वासमवार, विभा घोनमाडे, रेणुकाताई घोडेस्वार, पूनम तिवारी, भाऊराव उताणे, मधुकर राऊत, राकेश कन्नोजवार, प्रदिप मांडवकर, सहारे, अजय दास, राकेश रविदास, अंजुम दास, अभिलेश मार्कंडवार, प्रणय डंबारे, महेश कोलावार, मनोज इटनकर, सुभाष ढवस यांचेसह अन्य भाजपा, भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

