News 34 chandrapur
चंद्रपूर - गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या कलकाम कंपनीच्या ब्रॅंच मॅनेजरला पोलिसांनी अटक केली असून एक फरार आहे.कंपनीत विदेश रामटेके व विजय येरगुडे यांनी ग्रामीण व शहरी भागात असंख्य एजंट नेमत कलकाम कंपनी मोठ्या प्रोजेक्ट व काम करीत असून त्यामध्ये आपण गुंतवणूक केल्यास आपल्याला दुप्पट परतावा मिळेल असे आमिष गुंतवणूक दारांना दिले.
कंपनीने चंद्रपुरातच तब्बल 90 ते 100 कोटी रुपये गोळा केले, मात्र वेळेवर परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदार संतापले, इतकेच नव्हे तर कंपनीने चंद्रपुरातील कार्यालय बंद पाडले. Kalkam infrastructure limited
गुंतवणूकदारांना पैसे मिळणार कसे असा पेच निर्माण झाला होता, मात्र पीडित गुंतवणूकदारांना शरद पवार विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांनी मदतीचा हात देत सरळ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व गृहमंत्री दिलीप वळसे यांच्या कार्यालयात धडक देत कलकाम विरोधात तक्रार केली. Investors fraud
गृहमंत्री पाटील यांनी तक्रारीची दखल घेत कलकाम विरुद्ध चौकशीचे आदेश दिले.
23 मे ला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या दौऱ्या निमित्त शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांनी राज्यमंत्री तनपुरे यांची गुंतवणूकदारासाहित भेट घेतली.
गुंतवणूकदारांचे निवेदन तनपुरे यांनी स्वीकारत जिल्हा पोलिस अधीक्षकांना सम्पर्क साधत कलकाम कंपनीच्या चौकशीबद्दल विचारणा केली.
सदर प्रकरणी एकाला अटक झाल्याची बाब कळल्यावर या प्रकरणात अजून आरोपी अटक व्हायचे असून लवकर ते ही गजाआड असतील अशी माहिती तनपुरे यांना पोलीस अधीक्षक मार्फत मिळाली.
कलकाम च्या चौकशीत अनेक खुलासे पुढे आले आहे, काही दिवसात कलकाम कंपनीचे सर्व घबाड उघडकीस येणार आहे.
व यामध्ये राजकीय पुढारी सुद्धा सहभागी आहे अशी माहिती प्राप्त झाली असून पोलीस लवकरचं त्यांना अटक करणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजीव क्ककड,ज्येष्ठ नेते दीपक जयस्वाल, युवक अध्यक्ष नितीन भटरकर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे माजी शहराध्यक्ष शशिकांत देशकर , निमेश मानकर, सौरव उरर्कुडे, निलेश बोबडे,तसेच कलकाम कंपनीचे एजंट, गुंतवणूकदार उपस्थित होते.