News 34 chandrapur
चंद्रपूर - अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष व नागरी सत्कार सामारोह समिती च्या वतीने अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांचा एकसष्ठी निमित्ताने भव्य नागरी सत्कार सोहळा चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात मोठ्या उत्साहात रोहिदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
या सोहळ्याला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी अभिष्टचिंतन करताना खोब्रागडे परिवारातील जुने ऋणानुबंध असून या पुढे मी आणि बाळूभाऊ सोबत एकदिलाने बाबासाहेबांची रिपब्लिकन पक्ष संपूर्ण भारतभर गतिमान करणार असून तन मन धनाने सहकार्य करणार असल्याचे अभिवचन यावेळी दिले. जे इश्वराबाई यांच्या परिवरातील सदस्य महेशबाबू यांनी आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यात लवकरच अखील भारतीय रिपब्लिकन पक्षाची गाव पातळीवर संघटनबांधणी करणार असल्याचे सांगितले. आ.किशोर जोरगेवार यांनी नागरी सत्कार निमित्ताने भावी राजकीय व सामाजिक कार्यसाठी शुभेच्छा दिल्या, प्रा.जावेद पाशा यांनी भारतातील वास्तववादी राजकीय परिस्थिती विषद केली. मंचावर स्वागताध्यक्ष अशोक निमगडे, हेमराज चिंचखेडे, मोरेश्वर टेमुर्डे, ऍड.राम मेश्राम, दिपक जयस्वाल, पप्पू देशमुख,सुरेश पानतावणे, घनश्याम फुसे,संजय बोरकर, मिलिंद तायडे, डी.के.साखरे, पुराणसिंग जूणेजा, यांच्या सह खोब्रागडे परिवारातील जेष्ठ सदस्य सुधा हेमचंद्र खोब्रागडे,रिता प्रवीण खोब्रागडे, संगीता डोर्लीकर, अतुल खोब्रागडे, ऍड.रवींद्रकुमार डोंगरे, देविदास मोरे, पंकज धिवार, सुरेखताई बारसागडे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
संपूर्ण महाराष्ट्रातून व देशातील विविध राज्यातून प्रतिनिधी आले होते यावेळी विविध सामाजिक, धार्मिक, कर्मचारी संघटना, बौद्ध विहार व मंडळ त्याच सोबत सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने सत्कारमूर्ती प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन विशालचंद्र अलोने, प्रेमदास बोरकर आभार निर्मला नगराळे यांनी केले.
