News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - तालुक्यातील चिकमारा येथील रहिवाशी असलेल्या इसमाचा गावातील मामा तलावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 27 मे शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आले आहे. मृतकाचे नाव अरविंद कुभंरे वय 35 राहणार चिकमारा तालुका सिंदेवाही असे असून मृतक अरविंद कुभरे यांच्या उजव्या गालाला कॅन्सर झालेला होता.
Cancer त्यामुळे मृतक अरविंद कुभंरे आराम करत असे शुक्रवारी चार वाजताच्या सुमारास त्याच्या पत्नीने घरात बघितले असता तो दिसला नाही त्यामुळे गावात परिसरात शोधाशोध केली असता गावातील जवळील असलेल्या मामा तलावाचा पाण्यात अरविंद कुभंरे याचे प्रेत तरंगताना दिसून आले. याची माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशन ला देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करीत मृतदेह शव विच्छेदन करता ग्रामीण रुग्णालय सिदेवाही येथे पाठविण्यात आले. त्याने आजाराला कंटाळून तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावे असा अंदाज गावातील नागरीकांनी लावला आहे. सिंदेवाही पोलीस ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस पोलीस हवालदार शंकर राऊत हे करीत आहेत.