News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य व माजी खासदार नरेश बाबू पुगलिया यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त १६ वर्षावरील वयोगटाकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
परंतु राज्यस्तरीय बक्षीस पटकवणाऱ्या पडोलीची लावण्या सुभाष नागरकर हिचे वय १२ वर्षे असल्याने या मॅरेथॉन मध्ये तिला सहभाग घेता येणार नव्हते, परंतु खेळाविषयची तिची जिद्द आवड, मेहनत तिला स्वस्थ बसू देत नव्हती, बाबांच्या मागे लागून रडून धडून मला खेळायचेच आहे ही जिद्द तिने मनात ठेवली वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करून आयोजकांशी बोलून शेवटी तिला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली. वयोमर्यादेत ती बसत नसल्याने कोणताही चेस नंबर तिला दिला नाही परंतु फक्त मला धावायचे आहे बक्षीस नको ही भावना ठेऊन तिने मॅरेथॉन गाठली आणि पहिली आली. यावेळी तिला आयोजकांकडून प्रोत्साहन पर बारा हजार बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. एखादी गोष्ट करण्यासाठी तुमची मनाची तयारी असेल आणि तुम्ही जिद्द आणि चिकाटीने त्यासाठी प्रयत्न करत असाल तर यश तुमच्यापासून फार दूर नसते हेच लावण्याने दाखवून दिले. Marathon
अश्याप्रकारे जिद्द, प्रचंड मेहनतीच्या जोरावर तिने चंद्रपुरातील मॅरेथॉन स्पर्धा गाजवली.तिने यशाचे श्रेय त्यांचे कोच विजय भगत, दर्शन मासिरकर, प्रकाश नागरकर, आणि टिम D दशरथ ला दिल.
लावण्याची खेळाविषयी असलेल्या जिद्दीला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.