News 34 chandrapur
गडचांदूर सै.ममूम्ताज़ अली:-
युवकाने एका मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करून जखमी केल्यानंतर स्वतःच्या हातावर सुद्धा चाकूने वार करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना 23 मे रोजी दुपारच्या सुमारास गडचांदूर शहरा जवळील असलेल्या पर्यटन स्थळ माणिकगड किल्ल्यावर घडली. सदर घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची चर्चा असून दोघेही गडचांदूर येथील असून या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे. Attack on a girl out of one-sided love
सदर घटने संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की,गडचांदूर येथील 21 वर्षीय युवक आपल्या प्रेयसी मुलीला घेऊन माणिकगड किल्ल्यावर गेला.या दरम्यान सदर युवकाने मुलीकडे लग्नाची मागणी घातली.मात्र मुलीने याला नकर दिला. तेव्हा मुलाने रागाच्या भरात मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करून जखमी केले आणि स्वतःच्या हातावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. Manikgad fort दरम्यान किल्ल्यावर फिरायला आलेल्या काही पर्यटकांनी दोघांना रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यावर लगेच येथील वनमजूराला बोलावून यांना किल्ल्यावरून खाली आणले व नंतर संबंधित क्षेत्रातील जिवती पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही जवळच्या गडचांदूर ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुठील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.सध्या दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कळते. जिवती पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि जगताप करीत आहे.