News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल- नगर परिषद मुल क्षेत्रातील सर्व जनेतेला सुचित करण्यात येते की, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजेएनटी) आरक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पत आयोग गठित केला आहे.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानीक स्वराज्य संस्थांमधील नागरीकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केलेला आहे.
Political reservation
सदर कार्यक्रमामध्ये नागपुर विभागाकरीता दिनांक २८ मे २०२२ रोज सायं ४.३० ते ६.३० हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी नागरीकांना आपली मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदने देता यावेत यासाठी नोंदणी करण्याकरीता मा. जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर (निवडणुक विभाग) येथे सहायता कक्ष तयार करण्यात आलेला आहे.
तरी मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे दिनांक १९ मे २०२२ च्या पत्रान्वये प्राप्त झालेल्या या सुवर्ण संधीचा मुल मे शहरातील नागरीकांनी व विविध संघटनांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आव्हान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा वजाळे, यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
