News 34 chandrapur
चंद्रपूर - महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी ४८६ कोटी १५ लाखाच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारां विरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात येत असून ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे. Chandrapur mseb
चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन ३० कोटी २१ लाख येणे आहे,तर वाणिज्यिक गाहकांकडुन ७ कोटी ३६ लाख येणे आहे. औदयोगिक ग्राहकांकडुन ८ कोटी ५० लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून २७७ कोटी ६६ लाख तर ग्रामिण व शहरी पथदिवे यांच्याकडून २१९ कोटी २१ लाख येणे आहेत. नोटीशीची मुदतही संपल्यामुळे घरगुती ग्राहकांसोबतच आता पाणीपुरवठा योजना, पथदिवे, थकबाकीत असलेले सरकारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे या महिनाभरातच चंद्रपूर परिमंडळात १ हजार १४१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडीत झाल्यास सामान्य जनेतेची असुविधा ओढावत आहे.
विशेष म्हणजे दिवसेंदिवस वीजेचा वापर वाढतच आहे. Msedcl
२०२१ च्या मे महिण्यात चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, सरकारी कार्यालये, औदयोगिक व पथदिवे आदी लघूदाब ग्राहकांनी ७३ कोटी रुपयांची वीज वापरली होती तीच वाढूण आता २०२२ च्या मे महिण्यात ९३ कोटी ७५ लाखांवर पोहेाचली आहे.
महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून वसुल केलेल्या पैशातूनच वीजखरेदी करून महावितरण ग्राहकांप्रति जबाबदारी पार पाडत वीज खरेदी करून वीजपुरवठा करीत आहे हीवस्तुस्थिती आहे.वीजबिल वसुलीतून प्राप्त पैशामधून ८५ टक्के रककम वीज खरेदीवर केली जाते. महावितरण प्रथम वीज पुरवठा करते व नंतर वीजबिल देते.याउलट अनेक सेवासांठी आधी पैसे व नंतर सेवा असे असते. तरीपण वीजकंपनीच्या अभियंता कर्मचारी वर्गास मारहान, अपमान सहन करून ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरण अपेक्षित असतांना वसुलीसाठी त्यांच्या दारी जावे लागत आहे. वीजग्राहकांना २४ तास वीजपुरवठा मिळविण्यासाठी महावितरण वीजनिर्मिती कंपण्याकडून वीज खरेदी करते व वसुल झालेल्या पैशातूनच वीजखरेदी करत असते. वीजनिर्मिती कंपन्या कोळसा,नैसर्गिक तेलवीज निर्मितीसाठी खरेदी करतात व त्यापण कोळसा व तेलकंपण्यांना पैसे देणे लागतात. परंतु वसुलीच झाली नाही तर हे चक्र पूर्णपणे कोलमडणार.
महावितरणने केलेल्या विविध पायाभूत कामांच्या सक्षमीकरणांमुळे सक्षम झालेल्या वीजयंत्रणेने मे महिण्यात वीजेची २४००८ मे.वॅ. (२४६६८ मे.वॅ.) इतकी उच्च मागणी पूर्ण केली व वीजपुरवठ्याचा आजवरचा नवा विक्रमी टप्पा गाठला आहे. Arrears महावितरणने ग्राहकांची काळजी घेत विविध पायाभूत कामे करुन त्यांना प्रसंगी खुल्या बाजारातून १५ रुपये पर्यंत प्रति युनिट दराने महागडी वीज खरेदी करुन वीजपुरवठा करत ग्राहकांना भारनियमनाच्या झळा बसू दिल्या नाही. कोळसा टंचाईचे संकट व उन्हाच्या तडाख्यामुळे विजेची वाढती मागणी कायम असताना भारनियमन यशस्वी नियोजनाद्वारे ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्याचा सुखद दिलासा दिला आहे. याऊलट देशात अनेक राज्यांमध्ये भारनियमन असतांना राज्यात कोणत्याही भागातील वीजवाहिनीवर भारनियमन नाही. सोबतच कृषिपंपांना देखील वेळापत्रकानुसार चक्राकार पद्धतीने दिवसा व रात्री ८ तास वीजपुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेवून ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.
चंद्रपूर व गडचिरोली मंडलातील व ग्राहक निहाय चालू व मागील वर्षातील एकूण थकबाकी
ग्राहकांची वर्गवारी चंद्रपूर मंडल गडचिरोली मंडल एकूण थकबाकी
घरगुती २० कोटी ३३लाख ९ कोटी ८७ लाख ३० कोटी २१ लाख
वणिज्यिक ५ कोटी ८४ लाख १लाख् ५२ ७ कोटी ३६ लाख
औदयोगिक ५ कोटी ८३ लाख २कोटी २१ लाख ८ कोटी ०४ लाख
पाणीपुरवठा येाजणा १कोटी ९७ ८० लाख २ कोटी ७७ लाख
शासकिय कार्यालये व इतर १कोटी ४२ लाख २कोटी ३६ लाख ३ कोटी ७८ लाख
कृषिपंधारक ११०कोटी ६१ लाख १०९कोटी १३ लाख २१९ कोटी ७४ लाख
ग्रामिण व षहरी पथदिवे ७७ कोटी ८८ लाख १३६कोटी ३२ लाख २१४ कोटी २० लाखएकूण २२३कोटी ९१लाख २१९ कोटी १७ ४८६ कोटी १५लाख
