News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
पंतप्रधान आवास योजनेची तीसरी किस्त त्वरित द्यावी आणि नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी लावलेला थकीत गृहकर व पाणीपट्टी करावरील व्याज रद्द करावा.जनहिताच्या या 2 मागण्यांसाठी गडचांदूर भाजपतर्फे भाजप दलित आघाडीचे शहराध्यक्ष प्रशांत खाडे व शक्ती केंद्र प्रभारी बब्लू रासेकर यांनी 19 मे पासून नगरपरिषदेच्या मुख्य गेट समोर आमरण उपोषण सुरू केले होते.
18 मे रोजी धरणे आंदोलन करण्यात आले यावर काहीच दिलासादायक तोडगा न निघाल्याने दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरू करण्यात आले.या दरम्यान अनेक घडामोडी घडल्या अखेर 6 व्या दिवशी या आंदोलनाला यश प्राप्त झाले.उशीरा का होईना पण नगरपरिषदेने मागण्या मान्य केल्या.येत्या 15 दिवसाच्या आत लाभार्थ्यांना घरकुलाचा निधी वाटप करण्यात येणार असून 2 टक्के व्याजा संदर्भात शासनाच्या मार्गदर्शनानुसार हा विषय सुद्धा मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन नगरपरिषदेकडून देण्यात आले आहे.आंदोलनाला यश प्राप्त झाल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.यावेळी उपस्थित सर्व भाजपाच्या पदाधिकार्यांसह आवास योजनेचे लाभार्थी व नागरिकांनी उपोषणकर्त्यांचे अभिनंदन केले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे,माजी आमदार अॕड. संजय धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर,भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,माजी नगरसेवक निलेश ताजने,जेष्ठ नेता महेश शर्मा, सुरेश केंद्रे,केशव गिरमाजी,महेश देवकते,हरीश घोरे,संदीप शेरकी,गणपत बुरटकर, राकेश अरोरा,अशोक दरेकर,दीपक गुरनुले,प्रतीक सदनपवार,मेहताब सर,अजीम बेग,इम्रान पाशा, सौ.विजयालक्ष्मी डोहे,सौ.रंजना मडावी,सौ.विना खंडाळकर,सत्यदेव शर्मा,तुषार देवकर,गंगाधर खंडाळे,हफिज भाई,महेश घरोटे आदींची प्रमुखाने उपस्थिती होती.
