News 34 chandrapur
चंद्रपूर - गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सिमेंट काँक्रिट मिक्सर ट्रक च्या वाहनचालकाचा आज सकाळी 11 वाजता दुर्दैवी मृत्यू झाला.
11 वाजता घुघुस पांढरकवडा मार्गावर धावत्या ट्रक मध्ये वाहनचालक 53 वर्षीय नीलकंठ जुगणहाके यांना हृदयविकाराचा झटका आला.
मात्र त्यावेळेसही नीलकंठ यांनी वाहनाचा अपघात होऊ दिला नाही, त्याच अवस्थेत नीलकंठ ने गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीत कॉल करीत छाती दुखत असल्याचे सांगितले, कर्मचारी तात्काळ पांढरकवडा येथे पोहचत नीलकंठ ला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दुर्दैवी बाब म्हणजे मागील वर्षी कोरोनामुळे नीलकंठ यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता, त्यांच्या निधनाने नीलकंठ व त्यांची 22 वर्षीय मुलगी प्रियंका पडोली येथील लहुजीनगर येथे राहत होते.
वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यावर प्रियंका पोरकी झाली, प्रियंकाला कम्पनी व्यवस्थापनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली होती, मात्र कम्पनी व्यवस्थापन 1 लाख रुपये देण्यासाठी तयार होती.
सदर बाब शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका उज्वला नलगे यांच्या कानावर येताच त्यांनी वाहनचालक नीलकंठ यांचा मृतदेह गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या पुढे ठेवण्यात आला.
उज्वला नलगे व युवा सेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने कम्पनी प्रशासन नरमले व त्यांनी मृतक वाहनचालकांच्या मुलीला 2 लाख रोख व 4 लाख रुपयांचा धनादेश दिला.
नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले.
यावेळी शिवसेना जिल्हा महिला संघटिका उजवला नलगे, युवासेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे, ऍड.अजित पांडे, सद्दाम कनोजे, ज्ञानेश्वर लोनगाडगे, सुश्मीत गौरकार, रोहन नलगे, चेतन कामडी, आतिष चिमुरकर, एकनाथ देवतळे, रोनीत नलगे, तुषार लोनगाडगे, शुभम घागरगुंडे व कपिल शेरकी यांची उपस्थिती होती.

