News 34 chandrapur
चंद्रपूर- चंद्रपूर च्या राजकारणात नेहमी चर्चेत असणाऱ्या विषया पैकी बाबुपेठ ब्रीज हा नेहमी चर्चेत राहीला आहे.
या ब्रिज ला 15 फरवरी 2016 ला मंजुरी मिळाली होती आणि त्यावेळचे वन, अर्थ तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन ते तीनदा भूमिपूजन करून याचा गाजावाजा करीत 2017 ची महानगरपालिका काबीज केली होती. Babu peth railway flyover
मनपा निवडणुकीनंतर या ब्रिजचे काम सुरू झाले त्यानंतर याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष गेले नाही, आणि हा ब्रिज अर्धवट अवस्थेत राहिला गेला. 2019 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान किशोर जोरगेवार यांनी सुध्दा बाबुपेठ च्या जनतेला ब्रिजचे काम तात्काळ पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. मात्र त्याचे पुढे काही झाले नाही, जोरगेवार आमदार झाले मात्र बाबुपेठ ब्रीज चे काम कासव गतीने सुरूच आहे. या पाठोपाठ आणि या नंतर सुरू झालेले दाताळा रोड वरील Ramsetu Bridge रामसेतू ब्रिज तसेच शिवनी- मारडा रोडवरील ब्रिज चे काम पूर्ण झालेले आहेत.
मात्र बाबुपेठ ब्रीजचे काम रखडलेले आहे. हे सर्व होत असताना याबद्दल आज पावेतो जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधी ने हा विषय विधानसभेत उचला नाही, किंवा बाबुपेठ ब्रिज बद्दल जनतेला न्याय दिला नाही.
मनपा निवडणुकीपूर्वी थोडासा निधी देवून, बाबूपेठ ब्रीज चे आमिष देवून निवडणूक जिंकण्यासाठी जनतेला मूर्ख बनवतील काय?
रेल्वे गेट बंद असल्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेले डिलिवरी पेशंट, रुग्ण, परीक्षेला जाणारे विद्यार्थी यांनी किती वर्ष हाल भोगायची?
महानगर पालिका निवडणूक जवळ आल्यानंतरच लोकप्रतिनिधींना बाबूपेठ ब्रिजची आठवण का येते हे जनता चांगली समजली आहे.
सतत लोकांची डोकेदुखी बनणारा हा ब्रिज आज मात्र श्रेय वादामुळे चर्चेचा विषय बनला आहे. या सर्व घटनेला बाबूपेठ जनता खिन्नपने बघत असुन बाबूपेठ जनतेच्या भावनांशी खेळण्यासाठी आणखी किती नैतिकता लोकप्रतिनिधींची खालावेल? असा आरोप आप चे राजू शंकरराव कुडे यांनी केला आहे.

