News 34 chandrapur
घुग्घुस - वाद करण्यासाठी एक क्षुल्लक कारण मोठं ठरते मग तो वाद कसलाही असो, त्याच रूपांतर मारहाणीत होतं.
असाच एक प्रकार घुघुस येथील केमिकल वार्डात घडला ज्यामध्ये जेवणाच्या वादात एका युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला.
29 मे ला एका लग्न समारंभात लडम सुरेश बरडिया या युवकासोबत जगदीश भसारकर, प्रशांत भसारकर व राहुल समदूरकर यांनी जेवणावरून वाद घातला.
वाद पुढे इतका वाढला की लडम बरडिया या युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला. Crime news
या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला, दरम्यान हे प्रकरण घुग्घुस पोलीस ठाण्यात पोहचल पोलिसांनी तिघांवर 323,324,504,(34) गुन्हे दाखल केले आहे. या घटनेचा पुढील तपास घुग्घुस पोलीस करत आहेत.
