News 34 chandrapur
घुग्घुस - जगातील भयावह महामारी कोरोनामुळे कोट्यवधी नागरिक बेरोजगार झाले, अनेकांनी आर्थिक तंगीमुळे आत्महत्या केल्या, कोरोना महामारीच्या 2 वर्षाच्या काळानंतर आज नागरिक सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.अशीच एक घटना 30 मे ला घुग्घुस येथे घडली, चंद्रपूर मार्गावर असलेले प्रिझम फोटो स्टुडिओ चे संचालक 40 वर्षीय सुनील भाऊराव मेळावार यांनी आर्थिक तंगीला कंटाळून फोटो स्टुडिओ मध्ये 30 मे च्या सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान गळफास घेत आत्महत्या केली.
सदर बाब नागरिकांना कळताच त्यांनी फोटो स्टुडिओ मध्ये धाव घेत पोलिसांना पाचारण केले, मात्र उपचारादरम्यान रात्री 8.30 ला सुनील चा मृत्यू झाला.
कोरोना काळात लग्न समारंभात कमालीची घट झाली, आजच्या आधुनिक युगात नागरिक लग्न समारंभात फोटोग्राफर ला बोलावणे टाळतात, मोबाईलच्या युगात नागरिक स्वतः फोटोग्राफी करीत आहे, यामुळे लग्न समारंभात फोटो काढण्याचे ऑर्डर मिळत नसल्याने सुनील यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न त्यांना नेहमीच भेडसावत होता. Photographer suicide
अनेक दिवसांपासून ते मानसिक तणावात होते, मात्र 30 मे ला त्यांनी स्टुडिओ मधील पंख्याला गळफास लावत आत्महत्या केली.
त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई,वडील, भाऊ व मोठा आप्त परीवार आहे.
