News34 chandrapur
चंद्रपूर - जागतिक तंबाखू विरोधी दिवस हा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) हा दिवस साजरा करण्याचे ठरवले आणि चर्चेअंती त्यांनी १९८७ साली यावर अंतिम ठराव संमत केला. जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ सालापासून दरवर्षी ७ एप्रिल रोजी 'वर्ल्ड नो टोबॅको डे' पाळला जाईल अशी घोषणा केली, या तारखेला जागतिक आरोग्य संघटनेला ४० वर्षे पूर्ण होत होती म्हणून हा दिवस ठरवण्यात आला, परंतु काही कारणास्तव हा दिवस बदलण्यात आला आणि ३१ मे हा दिन निश्चित करण्यात आला. म्हणून १९८८ सालापासून दर ३१ मे रोजी वर्ल्ड नो टोबॅको डे पाळण्यात येतो.
World No Tobacco Day
World No Tobacco Day
जगात अनेक नागरिकांना विविध बाबींचे व्यसन जडले आहे, ते धूम्रपान असो की मद्यपान हे दोन्ही व्यसन शरीराला हानिकारक आहे तरीसुद्धा आजही नागरिक धूम्रपान करीत आहे.
तंबाखूमुळे जीवघेणा आजार म्हणजे कॅन्सर या आजाराच्या विळख्यात अनेक नागरिक येत आहे, पण व्यसन काही सुटत नाही, त्यामुळे कॅन्सर, डोळ्यांचे, फुफ्फुसांचे आजार मोठया प्रमाणात वाढत आहे.
आपल्या देशात तंबाखू सेवन हे अधिक करून धुम्रपानातून होतं आणि तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरंय की जो व्यक्ती धुम्रपान करतो त्याला तंबाखूचे दुष्परिणाम तर भोगावे लागतातच, पण त्याच्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातही तो तंबाखूजन्य धूर जाऊन त्या निष्पाप व्यक्तीला देखील त्याचे परिणाम भोगावे लागतात. याचा अर्थ असा की तुम्ही धुम्रपान न करून सुद्धा तुम्ही नकळत धुम्रपान करत आहात.
चंद्रपुरात अन्न व औषध प्रशासनाने 2020 पासून सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली मात्र यावर अजूनही अंकुश लावण्यास प्रशासन असमर्थ ठरले.
17 एप्रिल 2020 पासून ते 19 एप्रिल 2022 पर्यंत अन्न व औषध प्रशासन विभागाने तब्बल 64 कारवाया केल्या असून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मात्र अजूनही सुगंधित तंबाखू तस्करी जैसे थे तशीच सुरू आहे.
यावर अजूनही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाही.
विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात नकली सुगंधित तंबाखू कारखान्यावर कारवाई सुद्धा झाली होती.
नकली बाबूल, माजा चंद्रपुरात बनविल्या जात आहे, ते खर्र्या मार्फत तरुण पिढीच्या शरीरात जात कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारात बदलत आहे.
मात्र प्रशासन दरवर्षी तंबाखू विरोधी दिवस आला की बॅनर व पोस्टर बाजी करीत आपले कर्तव्य पार पाडत आहे. जिल्ह्यात अनेकांनी तोंडाच्या कॅन्सर ने आपला जीव गमावला, शासकीय रुग्णालयातील रुग्णांचा आकडा कमी जरी असला मात्र खाजगी रुग्णालयातील आकडा सर्वात जास्त आहे.
कोरोनापेक्षा घातक असलेला कॅन्सर जिल्ह्यात वेगाने पसरत आहे, यावर नियंत्रण लावणे गरजेचे आहे.
तुम्ही कोणा धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर हे केमिकल्स तुमच्या शरीरातही प्रवेश करतात आणि जास्त वेळ राहतात. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की एखादा व्यक्ती फुफ्फुसाच्या कर्करोगाने मेला पण त्याने कधीच व्यसन केलं नव्हतं, तर मंडळी त्याचा जीव याच पद्धतीने गेलेला असतो. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्यांपासून दूरच राहावे.
३१ मे हा दिवस फक्त लोकांना आठवण करून देण्यासाठी आहे की आपण अजूनही तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्त झालेलो नाही. आपली लढाई अजून बाकी आहे. मंडळी तुम्ही सुद्धा एक सुजाण नागरिक म्हणून या लढाईत सहभाग दर्शवला पाहिजे. जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर हे व्यसन सोडायचा प्रण घ्या. जर तुम्ही निर्व्यसनी असाल तर इतरांना हे व्यसन सोडायला प्रवृत्त करा, अनोळखी माणसांना तुम्ही समजावू शकत नसलात तरी ओळखीच्या माणसांना तुम्ही नक्कीच समजावू शकता.
