News 34 chandrapur
राजुरा - राजुरा वरून बाईकने पाचगावकडे जात असताना बाईक आणि ट्रकचा राजुरा गडचांदूर महामार्गावरील आर्वी गावाजवळील दर्ग्यासमोर अपघात झाला या अपघातात बाईकस्वार अंकुश दादाजी मडावी (वय २४) याचा जागीच मृत्यू झाला आहे. Accident
पाचगाव येथील अंकुश दादाजी मडावी हा काही घरगुती कामानिमित्त राजुरा येथे आला होता काम आटोपून एम.एच.३४ (क्यू)६४३२ या क्रमांकाचे बाईकने गावाकडे जात असताना समोरून येणार जे.एस.ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच. ३१सीक्यू (CQ) ३५२९ यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.
या अपघातामध्ये अंकुश मडावी याचा जागीच मृत्यू झाला हा अपघात सायंकाळी ४:३० वाजताचे दरम्यान झाला याची माहिती प्रथम दर्शनी नागरिकांनी दिली असून अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर हे घटनास्थळी पोहचून शवविच्छेदन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे, तोपर्यंत ट्रक चालकाला अटक झाली नव्हती.
