News 34 chandrapur
चंद्रपूर - राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काही राजकीय पक्षांकडून धार्मिक तेढ निर्माण केले जात आहेत. हे समाजाच्या भल्यासाठी नाही. त्यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. त्याचा कुटुंबालाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे बहुजन समाजातील मुलांनी अशा आसामाजिक कार्यात सामील होऊ नये, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राकेश गावतुरे यांनी केले आहे.आज 30 एप्रिल रोजी त्यांनी हॉटेल ND येथे पत्रकार परिषद घेतली. यात शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ते म्हणाले की समाजातील तरुणांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. शिक्षण, रोजगार, आरोग्य, महागाई या समस्या भेडसावत आहेत, त्या दूर करण्याची आज खरी गरज आहे. मात्र राजकीय पक्ष आणि सत्ताधारी त्यावर बोलायला तयार नाहीत. त्यामुळे तरुण पिढी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांच्या या आमिषाला बळी पडून चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना भोंगे या विषयावर चर्चा केली जात आहे. मात्र राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी राजकारण्यांकडून केले जात असलेले हे प्रयत्न आता थांबले पाहिजेत. राजकीय पक्षांकडून निवडून येण्यासाठी तरुणांकडून मते मागितली जातात. मात्र त्यांच्या प्रश्नावर काहीच कोणी बोलत नाही. लोकांच्या मूलभूत प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देण्याची मागणी देखील गावतुरे यांनी केली.
सर्वसामान्य मुलांच्या हातात तलवारी, दगड देण्याऐवजी राज्यकर्त्यांनी रोजगार द्यावा, ते न करता त्या युवकांना दंगली व धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी परावृत्त केले जात आहे, हे सर्व थांबायला हवे. Religious riots
प्रत्येकाला आपल्या धर्माची उपासना करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांनी बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य झिजविले, त्यामुळे आज बहुजन समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, मात्र राज्यकर्ते धार्मिक दंगली व तेढ निर्माण करण्यासाठी बहुजन समाजाच्या युवकांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. Creating a rift in society
देशात महागाई व बेरोजगारीने तोंड वर काढले असून त्यावर एकही राज्यकर्ते ब्र सुद्धा काढत नाही आहे, खरचं देशाचा विकास करायचा असेल तर नागरिकांच्या हिताचे प्रश्न सभागृहात मांडायला हवे मात्र तसे न करता तरुणाना चुकीच्या मार्गाने लावणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न यावेळी डॉ. गावतुरे यांनी उपस्थित केला. Unemployment, inflation
युवकांनी सुद्धा अश्या असामाजिक कार्यात सहभागी न व्हावे यासाठी कुणबी समाज मंडळ, अखिल भारतीय माळी महासंघ, तैलिक समाज, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज, बेलदार समाज संघटना, VJNT वेल्फेअर असोसिएशन, गाडी लोहार समाज, भोई समाज, गाणली समाज, आदिवासी समाज, भारतीय बौद्ध महासभा, गोलकर समाज, नाभिक समाज, ख्रिस्ती समाज, गोवारी समाज, मादगी समाज, भाट समाज, सुतार समाज, मातंग समाज, माना समाज, बारई समाज, कुणबी समाज, धोबी समाज, भावसार समाज, शिंपी समाज, कलार समाज असे तब्बल 27 समाज संघटनांनी मागणी केली आहे.
