News 34 chandrapur
चंद्रपूर : गाडी थांबविल्याच्या कारणावरून वाद घालत एका युवकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना चंद्रपुरातील बंगाली कॅम्प चौकात शनिवारी घडली. अजय मेश्राम रा. खिरगाव नागभीड असे आरोपीचे नाव आहे. तर अरुण कोमुलवार वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. Traffic police chandrapur
अरुण कोमुलवार हे शनिवारी बंगाली कॅम्प चौकात कर्तव्यावर होते. दरम्यान, आरोपी अजय मेश्राम आणि त्याचा एक सहकारी दुचाकीने चंद्रपूरहून मूलमार्गे नागभीडकडे जात होते. कोमुलवार यांनी बंगाली कॅम्प चौकात मेश्राम याची दुचाकी थांबविली. यावेळी मेश्राम मागे बसून होता. तर त्याचा सहकारी दुचाकी चालवत होता. कोमुलवार यांनी वाहन परवान्याबाबत चौकशी करताच मेश्राम याने कोमुलवार यांच्याशी वाद घातला आणि त्याना शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या अन्य एका कर्मचाऱ्याने धाव घेत वाद सोडविला. Beating traffic police
मेश्राम याला पकडून ठेवत रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. मेश्राम याला रामनगर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या सुपूर्द केले. त्याच्यावर भादंवि कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
