News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये फक्त विकासाचे नावावर रोड आणि बांधकाम ह्या बाबीवर सध्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करुन राज्याला पुन्हा कर्जाच्या खाईत लोटण्याचे काम जोमात सुरु आहे.
गेल्या दोन ते अडीच वर्षापासुन नागभीड टी पाॅईन्ट ते शिवाजी चौक लोनवाही ह्या दरम्यान सुरु असलेले रोड, नाल्या, डिवायडर, पेवर ब्लाॅक व्रूक्ष लागवड, विद्दुतीकरण इत्यादी कामे ही अंतीम टप्यात असुन कार्यकारी अभीयंता सा.बा.वि.नागभीड अंतर्गत इतरही बरीच शी कामे सुरु आहेत. उपरोक्त क्षेत्रातील गांवात झालेली कामे व नगरपंचायत सिन्देवाही-लोनवाही हद्दीतील क्षेत्रात झालेली कामे ही भेदभावपूर्ण झाल्याचे तसेच इतर सुध्दा अवास्तव कामाचे बाबतीत संबंधीत विभागाशी वारंवार पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटीद्वारे लक्षात आणून दिले.
ड्रेनच्या आतील अतीक्रमण व विद्युत लाईन न काढताच काम करणे, रोडच्या बाजुला 30 ते 35 वर्षापासुन निवासी व व्यावसाइक राहत असतांना सुध्दा नाली, डिवायडर व पेव्हर बाॅक पासुन वंचीत ठेवणे, जंगलातून गेलेल्या रोडच्या बाजुने व्रुक्ष लागवड करुन आर्थीक नुकसान करणे, अपात्र रोडची नुतनीकरणाचे कामाकरीता निवड करणे, काही गांव विकासापासुन वगळणे, सिमेन्ट च्या कामावर पाण्याचा योग्य वापर न करणे, शिवाजी चौक लोणवाही ते देवयानी स्कूल पर्यन्तचे काम सुरु न करणे व ईतर मागण्यांबाबतचे निवेदन सुष्मा साखरवाडे, अधिक्षक अभीयंता सार्वजनीक बांधकाम मंडळ चंद्रपूर यांना देण्यात आले व येत्या 4-5 दिवसात समाधान कारक प्रगती न दिसल्यास दि 2/5/2022 ला लाक्षणिक उपोषण व तद्नंतर आमरण उपोषणाचा इशारा आम आदमी पार्टी चे विभागीय सदस्य मनोहर पवार यांचे नेत्रूत्वात देण्यात आला. यावेळी विलास गंडाटे, रूषीजी मानकर, अशोक सागरे, अनुप श्रीरामवार, राजेंद्रप्रसाद मिश्रा, अविनाश चंबुलवार, विठ्ठल कामडी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
