News 34 chandrapur
बल्लारशाह - बल्लारपूर क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सास्ती ओपन कास्ट माईन मध्ये दिनांक ८ एप्रिल २०२२ ला दुपारी २:०० वाजताच्या सुमारास वेकोली ची ट्रक सास्ती opencast coal mine मध्ये ट्रक पलटी झाल्यामुळे ५ कामगार जखमी झाले. त्यापैकी ३ कामगार गंभीर जखमी तर २ कामगार किरकोळ जखमी असल्याचे वृत्त आहे. गंभीर जखमी असलेल्या ३ कामगारांना पुढील उपचारार्थ नागपुरातील चौधरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Wcl accident
या संदर्भातील मिळालेल्या अधिक माहितीनुसार रामदास पेटकर, ट्रकचालक, निलेश हटवार वेल्डर, अरुण मांढरे फिटर, नूरखान फिटर, तिलक संभोज फिटर, हे सर्व ट्रक ने ड्रिल मशीनची रिपोर्ट तपासणी करण्यासाठी जात असतांना अचानक वाहनाचे संतुलन बिघडल्याने ट्रक पलटी झाला. सदर ट्रक चा वेग सुसाट असल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले अशी चर्चा आहे.
ज्यामुळे या ५ ही व्यक्तींना जखमा झाल्या, त्यांना प्राथमिक उपचारासाठी बल्लारपूर क्षेत्रातील वेकोलीच्या एरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येऊन पुढील उपचारार्थ नागपुरात चौधरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सदर अपघाताचे वृत्त कळताच वेकोलीच्या वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
