News 34 chandrapur
चंद्रपूर - कृष्णनगर येथील रहिवासी मनोज देवनाथ हा 27 एप्रिलला झांझरी कॉम्प्लेक्स मधील इंडसइंड बँकेत पैसे जमा करण्याकरिता आपल्या दुचाकी मोपेड ने गेला, मोपेड पार्किंग करून मनोज पैसे जमा केल्यावर परत आला असता त्याला त्याची दुचाकी कुठे आढळली नाही. Bike thiefयाबाबत त्याने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली, दुचाकी वाहन मोपेड क्रमांक MH34 AN 4101 या वाहनाचा शोध घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे सपोनि हर्षल एकरे यांनी तपास सुरू केला.
गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून रेकॉर्डवर असलेला सराईत गुन्हेगार शामनगर येथील 23 वर्षीय अतुल विकास राणा याला ताब्यात घेत विचारपूस केली असता सदर वाहन त्याने चोरी केल्याची कबुली दिली. Thief rana
रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्याबाबत अतुल ची कसून चौकशी केली, त्याच्या घरी पोलीस स्टाफ ने झडती केली असता चोरीचे 7 दुचाकी वाहन आढळून आले.
त्यामध्ये Honda Activa MH34 AN 4101, Yamaha MH34 AG 0861, Honda Shine MH29 AB 2381, Bajaj Pulser, Hero Honda Splender MH34 J 3726, Passion Pro MH29 AV 5396, Hero CBZ असा एकूण 2 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सदरची कारवाई रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, किशोर वैरागडे, पेतरस सिडाम, विनोद यादव, आनंद खरात यांनी यशस्वीपणे पार पाडली.
