News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल-चंद्रपूर जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागातील ११ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या बांधकामाच्या निविदेसाठी कार्यकारी अभियंत्याने आपल्या जवळच्या विश्वासातील कंत्राटदारांनाच काम मिळवून देण्यासाठी जिओ टगिंगचा गैरवापर केल्याची बाब उघडकीस आल्याने कमिशन घेणाऱ्यांचे पितळ उघडे पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देण्यात आलेली निविदाच वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मृद व जलसंधारण विभागात आता जिओ टॅगिंग प्रणालीचा अतिरेक सुरू असल्याने कंत्राटदारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. geo tag photo
११ एप्रिल रोजी काढलेल्या एका कामाच्या निविदेसाठी कार्यकारी अभियंत्यांच्या सांगण्यावरून कनिष्ठ अभियंत्याने जवळच्या फक्त तीन कंत्राटदारांनाच जिओ टॅगिंगचे प्रमाणपत्र दिल्याची बाब निदर्शनास आली. अर्थात जिओ ट्यागिंगचा वापर करणे म्हणजे फक्त प्रत्यक्ष अभियंत्याने कंत्राटं दाराला सोबत नेऊन फोटो काढणे पुरतेच मर्यादित असते, परंतु तसे न करता आपल्याच विश्वासातील कंत्राटदार यांनाच काम देण्यासाठी कार्यकारी अभियंत्याने केलेली धडपड असल्याचे दिसून आले आहे. geo tagging
मृद व जलसंधारण विभागात टक्केखोरीने सीमा गाठली आहे. या विभागात स्थानिक पातळीवरून वरच्या पातळीपर्यंत कामाच्या किमतीच्या ११ टक्के कमिशन हे ठरले आहे. किंबहुना ही टक्केखोरी या विभागात अलिकडे 'अधिकृत' झाली आहे. त्यानंतर २० टक्के कमिशन काम करणाऱ्या क्षेत्रात वाटले जाते. जवळपास २५ टक्के रक्कम टक्केखोरीत जात असल्याने ७५ टक्क्यात कंत्राटदाराला काम करावे लागत आहे. यावरुन कामही कशा दर्जाचा होईल हे सिद्ध होते, हा सर्व खर्च गृहीत धरूनच काम काढले जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून सांगितले जाते. या टक्केखोरीत अनेक कामे अडली आहेत. विकासाला आडकाठी बसत आहे. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीचे या गंभीर बाबीकडे लक्ष नाही, असे दिसते. गेल्या वर्षी १०० कोटींची कामे काढण्यात आली. geotag photos online
टक्केखोरीचा विषय पुढे आल्याने कामे रद्द करावी लागली. यावर्षीसुद्धा पुनरावृत्ती झाली. त्यामुळे मृद व जलसंधारण विभागाकडून एकमुस्त कामे न काढता एका- एका कामाची निविदा काढली जात आहे.
जिल्हा अधिकाऱ्याने ११ एप्रिल रोजी एका १ कोटी ४६ लाख ४९ हजार रुपये किमतीच्या कामाची निविदा काढली. नाल्यावरील गेटेड साठवण बंधाऱ्यावरील उर्वरित बांधकामाची ही निविदा आहे. २५ एप्रिलपर्यंत निविदा भरण्याची तारीख होती. त्यापूर्वी निविदा भरू इच्छीणाऱ्या कंत्राटदारांनी काम प्रस्तावित कामाच्या ठिकाणी जिओ जावून प्रत्यक्ष पाहणी करून त्या ठिकाणी काम करणे शक्य आहे आहे की,नाही,याची माहिती घ्यायची होती. परंतु ऐका कनिष्ठ अभियंत्यांच्या देखरेखीखाली जिओ ट्यागिंगचे काम चालते. हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय निविदा स्वीकारली जात नाही. त्यामुळे विश्वासातील कंत्राटदार यांनाच काम देण्याची ही शक्कल केल्याचे दिसून आले. याचे कारण असे की, कोणाला काम द्यायचे हे आधीच ठरविले जात आहे. एकंदरीत मृद व जलसंधारण विभागातील कनिष्ठ अभियंत्याने दोन सपोरर्टिंग कंत्राटदार सोबत घेऊन निविदा भरण्याचा डाव खेळला असल्याचा आरोप केला जात आहे. विश्वासातील कंत्राटदार याला एकदा काम मिळाल्यानंतर ते ठिकाण काम करण्या योग्य नाही अशी बाब पुढे करुन अनेक कंत्राटदार काम करीत नव्हते. त्यामुळेच जिओ ट्ट्यागिंग प्रणाली पुढे करण्यात आली. परंतु काही अधिकारी कंत्राटदाराशी संगनमत करून वेगळी वाट शोधल्याचे दिसते. त्यामुळे काढण्यात आलेली निविदाच वादात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
