News 34 chandrapur
चंद्रपूर - 4 एप्रिलला भद्रावती येथे 22 वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली होती.तरुणीचा मृतदेहाला शीर नसल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभे झाले होते, मात्र 5 दिवसांनी पोलिसांनी त्या प्रकरणाचा उलगडा केला.
सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेने मिळून सदर गुन्ह्याचा तपास केला असता यामध्ये मृतक युवतीची हत्या अपमानाचा बदला घेण्यासाठी झाली अशी धक्कादायक माहिती पुढे आली.
या गुन्ह्यात मृतकाची मैत्रीण विधी संघर्ष बालकाला अटक करण्यात आली. Murder mystery
मृतक व आरोपी हे दोघे एकत्र रूम करून राहायचे मात्र काही महिन्यांपासून दोघात भांडणे व्हायला लागली, मृतक युवती आपल्या मैत्रिणीचा इतरांसमोर अपमान करायला लागली, वारंवार होणारा अपमान बघता मृतक युवतीच्या मैत्रिणीने तिला अद्दल घडवायचे ठरविले. Bhadrawati crime
मुख्य सूत्रधार विधिसंघर्ष युवती आपल्या सोबत काहींना कटात सामील करीत 3 एप्रिलला वरोरा नाका चौकातून गाडीवर बसवून एका निर्जनस्थळी नेत युवतीवर चाकू हल्ला करीत तिचा गळा कापला.
सदर गुन्ह्याचा उलगड्याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली मात्र सदर गोपनीयता चंद्रपूरच्या स्थानिक वृत्तवाहिनीने सार्वजनिक केली.
सदर प्रकरणात किती आरोपी सामील आहे? या दोन मुली कुठे राहत होत्या? आरोपी कुठल्या जिल्ह्यातले? मृतक युवतीचे शीर अजूनही मिळाले नाही? हे सर्व रहस्य आजच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पत्रकार परिषदेत रहस्यचं ठेवण्यात आले.
अजूनही आरोपींचा थांगपत्ता लागलेला नाही, फक्त मृतक युवतीच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, पोलिसांनी संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा करण्यापूर्वी पत्रकार परिषद का घेतली? हे सुद्धा रहस्यच आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना प्रश्नांचे उत्तर रहस्यमयी रित्याचं मिळाले, पोलिसांनी प्रेस नोट मध्ये कुणाचेही नावे टाकले नाही, मात्र मृतक युवतीचे नाव काल स्थानिक वृत्तवाहिनीने जाहीर केले, त्यावर कारवाई होणार की नाही हे सुद्धा रहस्यचं आहे.
