चंद्रपूर - शीर नसलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या मृतदेहाच्या रहस्यमयी प्रकरणात अनेक नवीन बाबी पुढे येत असून सदर प्रकरणात अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Chandrapur news today
अपमानाचा बदला घेण्यासाठी सदर हत्याकांड घडवुन आणले अशी कबुली अल्पवयीन मुलीने दिली आहे.
आज सायंकाळी दाताला मार्गावरील रामसेतू पुलाच्या खालील भागात युवतीचे शीर मिळाले. Ramsetu bridge
आरोपीने त्या जागेवर शीर फेकले असल्याचे सांगताच स्थानिक गुन्हे शाखेने 2 गोताखोरांच्या मदतीने सदर शीर शोधून काढले.
कापडाच्या थैलीत असलेले शिर ओढणीने व अनेक कपड्यांच्या गुलदस्त्यात बांधून त्या पुलावरून खाली फेकले असल्याची माहिती मिळाली आहे. कपड्याच्या गुंडाळ्यात रक्ताने माखून असलेले ते शीर कुणाचे यावर सध्या तपास सुरू आहे.
आता ते शीर कुणाचे त्या युवतीचे की दुसऱ्याचे यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे, तपास केल्यावर भद्रावती पोलीस याबाबत सविस्तर माहिती देऊ शकणार.
या प्रकरणात अनेकांनी मृत मुलींचे मूळ फोटो समाजमाध्यमात व्हायरल केले होते, त्यांनतर काही अतिउत्साही वृत्तवाहिनीने त्या युवतीचा मूळ फोटो व नाव सार्वजनिक केले, पोलिसांनी सदर वृत्तवाहिनीवर काही कारवाई केली नाही. Young girl murder mystery
मात्र त्या वृत्तवाहिनीने प्रकरण अंगलट येत असल्याचे बघत बातमीपत्र डिलीट केले.
या प्रकरणात मृतक युवतीला नेणारा तो युवक कोण? चंद्रपुरातील प्रतिष्ठित घराण्याचा किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेला युवक तर नाही अशी चर्चा शहरात जोमात सुरू आहे. Chandrapur headless girl
युवतीची काय पार्श्वभूमी होती यावर मात्र पोलीस प्रशासनाने कमालीचे मौन बाळगले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल ने या प्रकरणात उत्तम कामगिरी बजावीत तात्काळ आव्हानात्मक गुन्ह्याचा उलगडा केला. Big crime
भद्रावती पोलिसांच्या चमूने शीर ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला.
