News 34 chandrapur
चंद्रपूर - म्हाडा वसाहतीमध्ये घर घेण्यासाठी अर्जदार यांना कुठेही घर नाही असे नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरिता चंद्रपूर महानगरपालिका येथील शून्य कन्सल्टन्सी येथे शिपाई पदावर कार्यरत मनोज मुन यांनी 5 हजार रुपयांची मागणी केली, तडजोडीअंती 1 हजार 500 रुपये स्वीकारताना चंद्रपूर लाचलुचपत विभागाने मुन यांना रंगेहात अटक केली.
गरिबांना सवलतीच्या दरात घरे उपलब्ध व्हावी यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सबसिडी देण्याची योजना सुरू केली. Acb trap
याच योजनेतून प्रधानमंत्री आवास योजनेमधून 2 लाख 65 हजारांची सबसिडी मिळविण्यासाठी घुटकाला येथील नागरिकाने 15 दिवसांपूर्वी मनपा येथे अर्ज केला मात्र त्यांना सदर योजनेचा लाभ मिळणेकरिता अर्जदाराचे कुठेही घर नाही असे नाहरकत प्रमाणपत्र लागेल व ते प्रमाणपत्र हवे असल्यास 5 हजार रुपयांची मागणी मुन यांनी अर्जदारकडे केली.
मात्र मुन यांना पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. Bribe
तक्रारिची दखल घेत अविनाश भामरे, पोलीस उपअधीक्षक लाप्रवी,चंद्रपूर यांनी 9 एप्रिलला सापळा रचत शिपाई मनोज मुन यांना 1500 रुपये स्वीकारताना रंगेहात अटक केली. Chandrapur acb
सदरची यशस्वी कारवाई एएसआय. रमेश दुपारे,
पो.ना.रोशन चांदेकर, नरेशकुमार ननावरे,वैभव गाडगे, संदेश वाघमारे मपोशी. मेघा मोहुर्ले,पुष्पा काचोळे पोनाचालक विकास काशीयावाले यांनी पार पाडली.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, चंद्रपूर
@ टोल फ्रि क्रं. 1064
