News 34 chandrapur
चंद्रपूर मनपाचा आम्ही चौफेर विकास केला - महापौर राखी कंचर्लावार
Mayor rakhi kancharlawar
संवाद साधताना मावळत्या महापौर राखी कंचर्लावार यांनी मागील ५ वर्षात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. २०१७ मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाल्यावर अंजली घोटेकर यांनी महापौर म्हणून विविध विकासकामे केली. सध्या मागील अडीच वर्षांपासून आपण महापौर म्हणून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला.
Chandrapur municipal corporation
एप्रिल २०१७ ते एप्रिल २०२२ या काळात मनपा निधी, नागरी दलित सुधार योजना, नगरोत्थान निधी, पायाभूत सुविधांचा विकास निधी व इतर निधी अंतर्गत विविध रस्ते विकासकामे यासाठी निधी देण्यात आला. या निधीतून कोनेरी स्टेडियम नूतनीकरण, बाबुपेठ येथील स्टेडियम बांधकाम, महाकाली मंदिर प्रभागात झरपट नदीचे सौंदर्यीकरण करण्यात आले. अमृत पाणीपुरवठा, आझाद बगीचा, कोरोना सेवा, लसीकरण मोहिम यासह केलेल्या विविध कामाची माहिती दिली. ही विकास कामे करताना अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी दिलेले सहकार्य, याबद्दल सर्वांचे आभार मानले.
चंद्रपूर मनपात 5 वर्ष भ्रष्टाचाराचे - पप्पू देशमुख
चंद्रपूरकरांचे हाल अन् सत्ताधारी मालामाल; हाच मनपाचा पाच वर्षाचा कार्यकाळ
पप्पू देशमूख यांनी केली मनपा सत्ताधाऱ्यांची पोलखोल
चंद्रपूर : शहराला सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभली आहे. राज्याच्या व देशाच्या विकासात शहराचा मोठा सहभाग आहे. अशा या एतिहासिक शहराच्या मनपामध्ये मागील पाच वर्षात झालेल्या घोटाळ्यामुळे शहराची प्रतिमा मलिन झाली. यासाठी महापौर राखी कचर्लावार व मनपाचे इतर भ्रष्ट पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी करीत महापौरांनी शहरातील चार लाख नागरिकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी नगरसेवक पप्पू देशमूख तसेच शहर विकास आघाडीच्या उपस्थित नगरसेवकांनी शुक्रवारी विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
मनपातील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या करोडो रूपयांच्या विविध घोटाळयांच्या विरोधात आजपर्यंत सभागृहात पुराव्यासह चौकशी व कारवाईची मागणी केली. परंतु, सत्ताधाऱ्यांनी घोटाळे व घोटाळ्यांच्या पुराव्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे चंद्रपूरच्या जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात यापुढे जमिनीवरची व न्यायालयीन लढाई लढून घोटाळेबाजांना अद्दल घडवू अशी, हमी नगरसेवक पप्पू देशमूख यांनी पत्रकार परिषदेतून नागरिकांना दिली. यावेळी शहर विकास आघाडीचे नगरसेवक दीपक जयस्वाल, नगरसेविका मंगला आखरे, नगरसेवक स्नेहल रामटेके,
बाबुपेठ प्रभागाच्या नगरसेविका पुष्पा मून आदी उपस्थित होते.
भ्रष्ट सत्ताधाऱ्यांमुळे शहराची दुर्दशा
मागील ५ वर्षांत संपूर्ण शहरात नव्याने रस्ते तयार करणे व रस्ते फोडणे हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना कमरेच्या त्रासला सामोर जावे लगात आहे. त्यातच प्रदूषण व धुळीमुळे आरोग्याच्या गंभीर समस्यांही निर्माण झाली आहे. याबाबचा अहवाल एका आंतरराष्ट्रीय संस्थेने जाहीर केलेल्याने देशमूख यांनी सांगतिले.
करोडोंच्या कामांत घोटाळयांची मालिका
कचरा संकलन व वाहतुकीच्या १०० कोटींच्या कामात कंत्राटदारांना लाभ पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. वकिलामार्फत मनपा आयुक्तांना नोटीस दिल्यानंतर मनपाने कंत्राटदाराच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने भ्रष्ट सत्ताधाऱ्याचा डाव फसला. नागपूर व मूल मार्गावर लागलेल्या नियमबाह्य वनज काट्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे वजन काटे बंद झाले. यातून ३० कोटी रूपयांची अवैध वसुली मनपाने केली. अमृतचे २३४ कोटी रूपयाचे काम, कोरोना बाधितांना जेवण पुरविण्याचे ७ कोटी रूपयाचे काम, टॅक्स मुल्यांकनाचे ६.५ कोटीचे काम, मापक यंत्र बसविण्याचे १९.२८ कोटीचे काम प्रसिध्दीचे २४ लाख रूपयांचे काम, वाहन पुरविण्याचे कंत्राट अशा करोडो रूपयाच्या विविध कामामध्ये मनपातील सत्ताधान्यानी घोटाळे केले. यांचे पुरावे देण्यात आले.
अमृतच्या पाण्याची अद्यापही प्रतीक्षाच
दीड वर्षामध्ये अमृतचे पाणी देण्याचा शब्द तत्कालीन पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिला होता. पाच वर्षांचा कालावधी होऊनही चंद्रपूरकरांना पाणी देण्यात मनपातील सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रभागातील लहुजी बावणे या नागरिकांच्या घरी अमृत योजनेचे उद्घाटन करण्यात आले. दोन दिवसातच अमृतचे पाणी येणे बंद झाले. अद्यापही ते अमृतच्या पाण्याची वाट बघत आहेत.
वडगाववासियांना दगा
वडगाव प्रभागातील निवासी घर असलेल्या नागरिकांच्या जागेच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वेळा आमसभेत मांडला. वारंवार आश्वासन देऊनही महापौर कंचर्लावार यांनी आरक्षण काढण्याची कार्यवाही केली नाही. मात्र बोटावर मोजण्याइतक्या श्रीमंतांच्या जमिनीचे आरक्षण त्यांनी काढले. महापौर कंचर्लावार यांनी वडगाव प्रभागातील नागरिकांना दगा दिल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
