News 34 chandrapur
राजुरा - उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील SDPO यांचे रायटर व वाहनचालकाला 29 एप्रिलला नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
विशेष बाब म्हणजे दोघांपैकी एकाच्या दुचाकी वाहनात 2 लाख 60 हजारांची रोकड जप्त केल्याने ती रक्कम वसुलीची तर नाही ना असा संशय बळावला आहे. Suicide attempt
राजुऱ्यातील दारू व्यावसायिकाला 50 हजाराची लाच रायटर राजेश त्रिलोकवार व वाहनचालक सुधांशु मडावी यांना रंगेहात अटक करण्यात आली.
सदर कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. Bribe police
50 हजार रुपयांची लाच व 2 लाख 60 हजारांची रोकड सोबत पुन्हा रक्कम वसुली संदर्भात यादी सुद्धा मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
रात्री 10 वाजेदरम्यान राजेश त्रिलोकवार याने शौचाचा बहाणा करीत बाहेर निघाले, मात्र भीती व बदनामी पोटी त्यांनी तलावात उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. Anti corruption trap in chandrapur
त्यांच्या या पाऊलाने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
वसुली कांडात अजून कुणाचा सहभाग आहे का? याची चौकशी सुरू असून पोलीस विभागातील तो "वाझे" कोण याचा शोध लाचलुचपत विभाग नागपूर करीत आहे.
