चंद्रपूर - आदिवासी समाजाच्या नावावर बोगस आदिवासी आपली सेवा चंद्रपूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात करीत आहे, मात्र 21 डिसेंबर 2021 च्या अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा शासन निर्णय असताना सुद्धा बोगस कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता खऱ्या आदिवासी बांधवांना शासकीय लाभापासून वंचित करण्याचे काम सुरू आहे.
खऱ्या आदिवासी बांधवांना न्याय देत बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना पदमुक्त करावे या मागणीसह अशोक तुमराम 7 एप्रिलपासून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात करीत आहे. Zila parishad chandrapur
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करून खऱ्या आदिवासींना नियुक्त करावे, अधिसंख्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे अधिकारी व शाळा व्यवस्थापनाची चौकशी करून कारवाई करावी, अधिसंख्येतेमुळे अशोक तुमराम यांना नाकारलेली उपमुख्याध्यापक पदाची पदोन्नती त्वरित देण्यात यावी, छोटुभाई पटेल हायस्कुल, शाळा व्यवस्थापन समितीची चौकशी करून त्यांचेवर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करीत कारवाई करण्यात यावी.
अश्या विविध मागण्यासह अशोक तुमराम 7 एप्रिलला जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण आंदोलन करणार आहे अशी माहिती अशोक तुमराम यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. Education department