News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील प्रभाग क्रं.5 गोपाल नगर येथे अत्यंत कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने घरातील विजेवर चालणारी उपकरणे शोभेच्या वस्तू बनल्या आहे. आवश्यकतेनुसार वीज पुरवठा होत नसल्याने कुलर,पंखे,फ्रीज खराब होण्याच्या भीतीने याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. Low power supply
रात्रीच्या सुमारास घरात कुलर,पंखे चालत नाही आणि बाहेर डास बसू देत नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली असून घरातील बोअरवेल सुरू होत नसल्याने भर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.या बाबींकडे गंभीरतेने लक्ष देऊन या क्षेत्रात लवकरात लवकर पूर्ण दाबाचा वीज पुरवठा करावा अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा नगरसेवक अरविंद डोहे यांच्या नेतृत्वात गोपाल नगरातील नागरिकांनी गडचांदूर Msedcl महावितरण उप कार्यकारी अभियंता व सहायक अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी नगरसेवक डोहे सह अरविंद कोरे, रमाकांत काळे, दीपक गुरनूले,बब्लू रासेकर, राजू माणूसमारे इतर गोपाल नगरवासीयांची उपस्थिती होती. Problems in hot districts
------------//----------
"सध्या तात्पुरत्या स्वरूपाची काही तरी व्यवस्था करू आणि येत्या 2 महिन्यात त्याठिकाणी नवीन डीपी लावून वीज पुरवठा सुरळीत करू" असे आश्वासन उप अभियंता यांनी दिल्याची माहिती असून आता आश्वासनाची पूर्तता होते की गोपाल नगरवासीयांना आंदोलन करण्याची पाळी येते, याकडे लक्ष लागले आहे.