News 34 chandrapur
चंद्रपूर - मागील दोन वर्षात झालेल्या कोरोना महामारीत भारतातील अनेकांचे कुटुंबाचे जीवन उद्धवस्त झाले असून त्यानंतर संपूर्ण भारतात महागाईने डोकं वर काढले आहे, त्यामुळे गृहिणीसोबत सर्व स्तरातील लोकांचे लचके तुटायला सुरुवात झाली आहे. या गोष्टीचा निषेधार्थ अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या मर्गदर्शनात व प्रेमदास बोरकर, मृणाल कांबळे, निर्मला नगराळे यांच्या नेतृत्वाखाली सिटी बजाओ होशमे आओ आंदोलन स्थानिक गांधी चौक येथे अनोखे आंदोलन घेणायत आले.
इंधन दरवाढ झाल्यामुळे तेल, डाळ, भाजीपाला असे अनेक जीवनावश्यक वस्तूची भाव वाढ झालेली आहे. भारत सरकारने शंभर रुपये गॅस जोडणी दिली पण सिलेंडर एक हजार रुपये ओलांडल्याने गॅस भरणे परवडत नसून चुलीवरचा धूर परवडला पण गॅस नको अशी भावना ग्रामीण व शहरी भागातील भगिनींच्या मनात येत आहे.पेट्रोल ,डिझेल आणि गॅसच्या दारात वाढ झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे घर संसार चालवणाऱ्या महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. inflation india
एकीकडे बेरोजगारी वाढत चालली असून महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेच्या जगणे कठीण झाले आहे त्यांची पीडा लक्षात घेत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात असंख्य महिला पुरुष युवकांच्या सहभागाने आंदोलन करण्यात आले. Fuel price hike
यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संताप व्यक्त केला यावेळी शहरातील अनेक वार्डातुन व गावातुन असंख्य नगरीत सामील झाले होते यावेळी अशोक निमगड़े, विशालचंद्र अलोने,अशोक टेंभरे, राजस खोबरागड़े, राजूभाऊ खोबरागड़े,शेषराव साहारे, प्रा. नागसेन वानखेड़े, राजकुमार जवादे,शंकर वेल्हेकर, अश्विनी आवले, ज्योति शिवनकर, गीता रामटेके, प्रेरणा करमरकर,अनिता जोगे,पुष्पा मूळे, छाया थोरात,नंदा जीवने, प्राची ठवरे, सुनीता बेताल, गोल्डी साहारे, सचिन पाटिल,नयन अलोने, हर्षल खोबरागड़े, प्रज्योत बोरकर, मारुति रामटेके,सुरेश वेस्केडे, उज्वाला गलबले, छाया बोरकर, वायजंतीमाला पाटिल, सरिता लिहिकर, छाया डोहिफोडे, अंजली निमगड़े, वी. जे. रंगारी, सुनील आवले, आर. डी खोबरागड़े, हंसराज जांभुले, अजबराव पुणेकर,राजश्री शेंदे, ज्ञानेश्वर गौरकर, ॲड.अजीत भड़के, नलिनी अलोने, अनिल अलोने, बंडू दूधे, प्रतिभा ठवरे, विट्ठल नगरकर, प्रेमदास रामटेके, दिलीप खाकसे, विजय करमरकर, , जीजाबाई खोबरागड़े, अश्विनी खोबरागडे, लीना खोब्रागडे, सुधीर ढोरे, सिद्धार्थ शेंडे, यशवंत मुंजमकर, भगवंता बाई मेश्राम, ममता निमगडे, माला चक्रवर्ती, पोर्निमा घोडमोड़े, कुनता जुंघरे, संगीता मेश्राम, किरन कांबले, सुमन आमटे, विशाल चिवंडे, माया खाकसे, ब्रम्हाकीर्ति वाहुले, इत्यादि प्रामुख्याने आंदोलनात सहभागी होते.
