News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
       गडचांदूर येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम जन्म उत्सव 10 एप्रिल रोजी मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला.या निमित्ताने श्रीराम नवमी जन्म उत्साह व शोभायात्रा समिती गडचांदूरच्या वतीने शहरात भव्यदिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.
आकर्षक रोषणाई,भजन,पालखी व ढोलताशेंच्या गजरात येथील राम मंदिर व हनुमान मंदिर येथून सुरू झालेली शोभायात्रा महात्मा फुले चौक,शेडमाके चौक,संविधान चौक,गांधी चौक,शिवाजी चौक असा मार्गक्रमण करत माता मंदिर जवळ समाप्त झाली. Ram navami
या दरम्यान शोभायात्रेत सहभागी राम भक्तांना येथील नुरी मोबाईलचे संचालक जावेद मिठाणी आणि दोस्ताना बूट हाऊसचे संचालक इरफान बेग या मुस्लिम बांधवांनी थंड पाणी व सरबतचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.सध्याच्या वातावरणात त्यांचे हे कार्य हिंदू,मुस्लिम एकतेचे अदभुत दर्शन देणारे असून शहरातील काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. Jai shri ram rally
यावेळी सतीश उपलेंचीवार,नगरसेवक अरविंद डोहे, निलेश ताजने, प्रतीक सदनपवार, अजीम बेग,हरी कुसळे, संदीप शेरकी,बंटी गुरनुले,राहूल चुरे,पंकज इटनकर इतरांची उपस्थिती होती.गडचादूर शहरातील समस्त धार्मिक बांधवांकडून असे सामाजिक बांधिलकीचे उदाहरण वेळप्रसंगी अनुभवायला मिळतात हे मात्र विशेष.
