News 34 chandrapur
चंद्रपूर :- काँग्रेसमध्ये येवून आज 3 वर्षे झालीत. पक्षात मान सन्मान मिळाला. मी खासदार आणि पत्नी आमदार झाली. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी नावानिशी ओळखतात. यापेक्षा मोठा सन्मान कोणता. त्यामुळे पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. मी मरेपर्यंत काँग्रेस सोडणार नाही, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. 
हॉटेल सिद्धार्थ प्रीमियम येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. 
Congress mp balu dhanorkar
यावेळी मंचावर माजी आमदार देवराव भांडेकर, काँग्रेस प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रेय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद अहिरकर, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील मारकवार यांची उपस्थिती होती. 
Congress news
याप्रसंगी ते म्हणाले, गांधी नेहरू घराण्याने या देशासाठी आयुष्य वेचले. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिले. अशा परिस्थतीही परदेशातून आलेल्या सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा हाती घेतली. सत्ता स्थापन केली. देशातील प्रत्येक धर्म आणि समाज आपला समजून कार्य केले. या देशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी त्यांनी स्वप्न बघितले, हे कौतुकास्पद आहे.
