चंद्रपूर - 3 एप्रिलला एका अल्पवयीन मुलीने 22 वर्षीय मैत्रिणीने अपमानास्पद वागणूक दिली म्हणून तिची अमानुषपणे हत्या केली. Inhuman murder
22 वर्षीय युवतीचा गळा दाबत तिच्यावर धारदार शस्त्राने वार करीत तिचे शीर धडावेगळे केले.
शीर धडावेगळे करीत त्या मृतक युवतीचे शीर चंद्रपुरात तर धड हे भद्रावती येथे फेकण्यात आले, दुसऱ्या दिवशी 4 एप्रिलला शीर नसलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती, मृतदेहाला शीर नसल्याने पोलिसांसमोर अज्ञात युवतीच्या मृतदेहाची ओळख पटविणे सुद्धा कठीण झाले होते. Murder mystery
मात्र 4 दिवसात स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल ने अतोनात मेहनत करीत त्या युवतीची ओळख पटवीत हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. The corpse of a young woman without a head
त्या मृतदेहाचे शीर रामसेतू पुलाखाली पोलिसांना मिळाले, आता पोलिसांना शोध होता तो कटात सामील असलेला युवक, मात्र म्हणतात ना "कानून के हाथ लंबे होते है" त्याप्रमाणे काल रात्रीच्या सुमारास तो युवक पोलिसांना गवसला. Lcb chandrapur
त्या 22 वर्षीय युवतीच्या हत्येनंतर तो युवक पसार झाला होता, 3 एप्रिलला ती 22 वर्षीय युवती त्या युवकाच्या दुचाकीवर बसून भद्रावती येथे गेली होती, त्याठिकाणी सदर हत्याकांड घडले.
रात्री संशयित म्हणून एका युवकाला भद्रावती येथून अटक करण्यात आली असून सध्या त्या युवकाची पोलिस सखोल चौकशी करीत आहे. आता या घटनेत पुन्हा काय नवीन खुलासे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर युवक हा युवतीच्या हत्येनंतर केरळ राज्यात पळाला होता, मात्र काल रात्री हा केरळ राज्यातून परत भद्रावती येथे आला, त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने त्याला अटक केली.
Cyber cell chandrapur
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भद्रावती पोलीस निरीक्षक भारती यांना सम्पर्क केला असता सध्या त्या युवकाला संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, सध्या तपास सुरू आहे, तो संशयित युवक त्या कटात सामील आहे किंवा नाही हे सायंकाळ पर्यंत कळेल असे सांगितले.
पोलिसांसमोर अनेक गुंतागुंती घेऊन पुढे आलेल्या या घटनेने अनेकांना बुचकळ्यात टाकले मात्र पोलिसांच्या चाणाक्ष बुद्धीने सदर प्रकरणात लवकर यश प्राप्त झाले.
