News 34 chandrapur
चंद्रपूर - 4 एप्रिलला शीर नसलेल्या एका 22 वर्षीय युवतीचे निर्वस्त्र स्थितीत असलेला मृतदेह आढळल्याने परिसरात एकचं खळबळ उडाली होती, महिला असुरक्षित असल्याची भावना यावेळी अनेक सामाजिक व राजकीय महिला संघटनांनी व्यक्त करीत सदर कृत्य करणाऱ्या आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी केली होती. Murder mysteryमृतदेहाला शीर नसल्याने पोलिसांसमोर अनेक अडचणी उभ्या होत्या, मात्र चंद्रपूर पोलिसांनी सदर आव्हान स्वीकारत तपास सुरू केला. Chandrapur police
150 ते 200 पोलिसांचे पथक घटनेचा तपास करू लागले, आधी काही माहिती न मिळाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करीत सदर वयोगटातील मुलीबद्दल बेपत्ता असल्याची तक्रार आहे काय याबाबत मोहीम चालविण्यात आली. Challenging offense
मात्र जिल्ह्यात कुठूनही बेपत्ता असल्याची तक्रार न मिळाल्याने पोलिसांनी सायबर सेल ची मदत घेत मोबाईल नेटवर्क ट्रेस करायला सुरुवात केली.
सायबर सेल चे मुजावर अली यांनी मोबाईल नेटवर्क ट्रेस करायला सुरुवात केली व त्यांना तपासात महत्वाची माहिती मिळाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीचा वापर करीत आव्हानात्मक असलेल्या या गुन्ह्यात 4 दिवसात तपास पूर्ण करीत या गुन्हा संबंधित अनेकांना ताब्यात घेतले. Cyber cell
सदर युवतीची ओळख पटल्याने पोलिसांनी मोठं यश प्राप्त केलं, पुढील 2 दिवसात या विकृत हत्याकांडातील संपूर्ण माहिती वरून पडदा उठणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात सदर आव्हानात्मक गुन्ह्याचा उलगडा करणारे सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदनचं करायला हवे. Chandrapur lcb
