News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील मध्यभागी भानापेठ येथे 31 मार्च च्या रात्री 11.30 वाजे दरम्यान भीषण आगीचे तांडवाने नागरिकांचा श्वास कोंडला गेला होता.डॉ.कुबेर हॉस्पिटल च्या मागील भागात प्लॅस्टिक आणि रबराच्या चपलेचे मोठे गोडावून आहे.
रबराच्या धुव्याने आसपासच्या भागात नागरिकांना श्वास घ्यायला त्रास झाला, (Shortness of breath) इतकेच नव्हे तर परिसरातील नागरिक घराबाहेर पडत धुव्यापासून जेष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी दुसऱ्या भागात नेण्यात आले. Fierce fire
नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला याबाबत सूचना दिली मात्र अग्निशमन विभागाची गाडी दाखल होताच घटनास्थळी गल्ली बोळाचा मार्ग असल्याने वाहन त्याठिकाणी जाऊ शकत नव्हते.
अनेक प्रयत्नांनंतर त्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले.
आधीच संपूर्ण जगात तापमानाबाबत चंद्रपूर सर्वात उष्ण असल्याचे जाहीर झाले मात्र या उष्णतेत रात्री लागलेल्या आगीने अनेक नागरिकांची कुलर व एसीमय झोप उडवून टाकली. Slipper warehouse fire
सदर चपलीचे गोदाम कुणाचे होते याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. सदर परिसरात हॉस्पिटल, तेलाचे होलसेल दुकान, कपड्याचे शोरूम होते, आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.
