News 34 chandrapur
चंद्रपूर - पंकज गुप्ता यांची यंग चांदा ब्रिगेडच्या शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी नियुक्ती पत्र देत हि नियुक्ती केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलीम शेख, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंडारे, आशा देशमुख, गौरव जोरगेवार, चंद्रशेखर देशमुख आदिंची उपस्थिती होती. Young chanda brigadeपंकज गुप्ता हे मागील अनेक वर्षापासून यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करित आहे. त्यांच्या नेतृत्वात अनेक समाजिक उपक्रम घेण्यात आली आहे. याची दखल घेत त्यांना पदोन्नती देण्यात आली असून यंग चांदा ब्रिगेडच्या शहराध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमूख उपस्थितीत सदर नियुक्ती करण्यात आली असून आमदार किशोर जोरगेवार यांनी नियुक्तीपत्र देत पंकज गुप्ता यांना शुभेच्छा दिल्या आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणीकरित्या पार पाडुन यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या गरजु पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करेल. सर्वसामान्यांना न्याय देण्याची माझी भुमिका असेल असे यावेळी नवनियुक्त शहराध्यक्ष पंकज गुप्ता यांनी म्हटले आहे.
