News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - चंद्रपूर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा,माळी महासंघाच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष, तथा क्रां.ज्यो.सह. पतसंस्थेच्या संचालिका, चंद्रपूर जी.प.च्या अध्यक्षपदी दोनदा विराजमान होऊन कार्यकाळ यशस्वी पूर्ण करणाऱ्या माळी समाजाच्या एकमेव जेष्ठ महिला नेत्या सौ संध्याताई गुरनुले यांनी नुकताच अध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल चंद्रपूर येथील त्यांचे शासकीय निवासस्थानी निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे व बैठकीचे अध्यक्ष माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष, माळी समाजाचे मार्गदर्शक माजी उपवनसंरक्षक,रोटरी क्लबचे सल्लागार, क्रां.ज्यो.सह. पतसंस्थेचे संचालक श्री.अरुण तिखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला समाजातील प्रमुख मान्यवर हजर होते. प्रामुख्याने बबनराव निकोडे बबनराव वानखेडे माजी नगराध्यक्ष विजू भाऊ राऊत,माजी नगरसेवक रवी गुरनुले, नगरसेविका शितल गुरनुले, नगरसेविका विजय चहारे, रवी चहारे, विशाल निंबाळकर,राजू मोहुरले, माधुरी वासेकर, ऋषी कोटरंगे पोंभूर्णा निलेश खरबडे अध्यक्ष माळी महासंघ, डॉ. लेनगुरे,श्री.रोडमल गहलोत, डॉ. दाभेरे, माळी महासंघाचे पदाधिकारी व जेष्ठ समाजबांधव,महात्मा फुले समाज सुधारक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, माळी समाजाच्या विविध संस्थांचे पदाधिकारी,महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत समाजाच्या चळवळीवर चर्चा करण्यात आली. समाज संघटनेबाबत एकतेबाबत उपस्थित पदाधिकारी यांचेकडून आढावा घेण्यात आला. तसेच समाजाची दशा व दिशा, वर्तमान राजकीय स्थितीबाबत सुदधा चर्चा करण्यात आली. सत्कारादाखल व निरोप समारंभा प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना सौ.संध्याताई गुरनुले यांनी समाजातील कुठल्याही व्यक्तीने संघटनेत कार्य करतांना पदाची अपेक्षा न बाळगता निष्ठेने कार्य केल्यास यश आपोआप चालून येते. यामध्ये आजच्या युवा पिढीने समाज कार्यात पुढाकार घेतला पाहिजे कारण समाजाची खरी ताकद युवाच असल्याचे सांगितले. बैठकीचे अध्यक्ष अरुण तिखे साहेब यांनीही समाज बांधवांनी समाजाच्या कुठल्याही संघटनेत काम करतांना भेदभाव न करता कार्य केल्यास संघटना मोठी होऊन पुढे जात असते आणि याची दखल राजकारण्यांनी घेत असतात.संघटनेत फार मोठी ताकद असते.असे अमूल्य मार्गदर्शन केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
