News 34 chandrapur
चंद्रपूर - चार भिंती कुडाच्या, कधी नुसत्याच बांबूच्या ताटव्याच्या व त्यांवर शेणामातीचे लिंपण व त्यावर टीनाचे, एसबेस्टास चे गळके पत्र्यांचे छत,फार तर विटाच्या प्लास्टर केलेले मोठ्या मेहनतीने पैसा गोळा करुन बांधलेले घर त्यावर टीनाचे, एसबेस्टास चे गळके छत. दिवसा सूर्यादेवाने भरभरून दिलेला प्रकाश तर त्याच सूर्याप्रकाशामुळे चंद्रपूर सारख्या उष्ण शहरात सोसाव्या लागणाऱ्या उन्हाच्या झळा. चंद्रप्रकाशाने न्हाऊन निघालेल्या कित्येक रात्री चंद्राला धन्यवाद देत तर कृष्णपक्षाच्या अंधाऱ्या रात्री तेलाच्या दिव्यात.. सरपटणारे विंचू, साप, कीटक यांची भीती उराशी बाळगून काढलेल्या. गरिबीत जीवन कंठत आलेल्या सहा गरिबांच्या जीवनातील अंधारास पण आता पूर्णविराम मिळाला आहे. Chandrapur msedcl
संध्या शरद गायकवाड या Midc भागात राहणाऱ्या असो किंवा रामनगरात राहणाऱ्या प्रतिमा अमर भोपारे, तुकूम मध्ये राहणाऱ्या सपना प्रेमदास जुमनाके असो रमाबाई नगर येथे राहणारे अमर भगत, किंवा घुग्गुस च्या आमराई वॉर्डात राहणारे श्रीराम गिरडकर किंवा असो भटाली पायली, दुर्गापूरचे भास्कर दत्तूजी मादेकर या सर्वांना एकच नाळ जोडून आहे. सर्वांची एकच कहाणी आहे. कहाणी आहे जीवन संघर्षाची. हातावर पोट घेऊन जगताना, गरिबीशी दोन दोन हात करण्याची -अंधारात जगण्याची. Power connection
गुडिपाडव्याचा मुहूर्त साधून महावितरणने त्यांच्या जीवनातील अंधाराला पूर्णविराम दिला आहे. आज गुडिपांडव्याचा मुहूर्तावर महावितरणचे सहाय्यक अभियंते कुणाल पाटील, सशांक बंडीवार, प्रतीक कुहीटे, अंकित कुमरे,अमोल धूमणे, कुनाल कन्नाके यांनी या सहा गरिबाघरी वीज पोहोचवीत त्यांचासोबत गुडीपाडवा साजरा केला. उपकार्यकारी अभियंते, अनिल पेंदोर व अरुण मानकर यांनी या सहा गरीब जीवनाशी दररोज लढणाऱ्या लढवय्यांच्या जीवनात प्रकाश पोहोचण्याच्या हेतूने त्यांचे अर्ज लगेच मान्य करीत विजजोडणी देण्याचे नियोजन केले. Chandrapur news
यातील सपना भोपारे यांच्या दोन शिकत असलेल्या मुलींचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात महावितरणला अहोभाग्य लाभले आहे. परीक्षेच्या (exam) दिवसात आता त्यांना प्रकाशात अभ्यास करता येणार आहे.
तर इतरांच्या घरातील लहान -थोरांची उन्हाळ्याच्या दिवसात अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून जराशी का होईना, उसंत मिळणार आहे व रात्रीस प्रकाश मिळणार आहे. (Hot Summer)
या सहाही जीवन संघर्षाची कहाणी लिहिणाऱ्यांनी महावितरणच्या अभियंता, कर्मचारी यांना वेळोवेळी वेळेवर आपण विजेचे बिल भरू असे आश्वासन दिले आहे व महावितरणचे त्यांच्या जीवनात प्रकाश पोहोचविल्याबद्दल आभार मानले आहे. तर अशा गरिबांच्या घरी गुडिपाडव्यासारख्या नववर्ष (new year) दिनी प्रकाश पोहोचविण्याचे भाग्य लाभल्याने महावितरणने धन्यता मानली आहे.

