News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
   दिवस हा नवसंकल्पाचा,चला उभारू समृद्धीची, परिवर्तनाची,जलसमृद्धीची,नवनिर्मानाची गुढी. मराठी नववर्ष गुढीपाडवा हा हिंदु समाजाचा नवीन वर्षादिन!साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त! या दिवशी कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात केली तर ते काम पूर्णत्वास जाते आणि फलदायी ठरते अशी धारणा आहे.
यासंदर्भातील पौराणिक कथेनुसार या दिवशी प्रभु रामचंद्रांनी दशानन रावणाचा वध करून अयोध्येत आगमन केले तेव्हा त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ अयोध्यावासीयांनी आपापल्या घराला गुढी उभारून, दिव्यांची रोषणाई केली होती. Gudi padwa
यासंदर्भातील पौराणिक कथेनुसार या दिवशी प्रभु रामचंद्रांनी दशानन रावणाचा वध करून अयोध्येत आगमन केले तेव्हा त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ अयोध्यावासीयांनी आपापल्या घराला गुढी उभारून, दिव्यांची रोषणाई केली होती. Gudi padwa
तो दिवस चैत्रपाडवा म्हणजे वर्षाचा पहिला दिवस होता. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा पडली.या दिवशी शेतकरी नवीन वर्षाची सुरूवात करत शेतात पुजा करतो आणि वार्षीक करारावर शेतावर नवीन सालगडी ठेवण्याची परंपरा आहे.गेल्या दोन वर्षापासून corona नामक महामारीचे सावट देशावर असताना जगाचा पोशिंदा बळीराजा मात्र अनेक संकट व सततची नापिकी सोबतच अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देत शेती करत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर बळीराजा मोठ्या हिमतीने पुन्हा सज्ज होऊन शेतात पुजाअर्चना करताना दिसत आहे.इतर ठिकाणांसह कोरपना तालुक्यातील वनसडी येथील रोशन आस्वले या शेतकऱ्याने गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या लहान बाळासह शेतात पुजा करत "यंदातरी जोमात पीक होऊ दे" अशाप्रकारे समस्त शेतकरी बांधवांसाठी चक्क देवाला साकडे घातले असून देव या शेतकरी पीता पुत्राची मनोकामना पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
