News 34 chandrapur
चंद्रपूर - जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रक्ताचे नमुने गोळा (blood sample) करून, रोगांचे निदान करण्याचे कंत्राट हिंद प्रयोगशाळा व एस टू इन्फोटेक (infotech) पुणे कंपनी कडे आहे. सदर प्रयोगशाळेत जिल्हाभर जवळपास १४० कर्मचारी कार्यरत असून, कोरोना काळात काम करणाऱ्या या कोरोना योध्दाना मात्र अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविष सिंग, अक्षय चौधरी याना प्राप्त होताच, चंद्रपूर येथील हिंद प्रयोगशाळेतील शेकडो कर्मचाऱ्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रयोगशाळेवर घेराव आंदोलन केले.
Chandrapur mns
Chandrapur mns
यावेळी कर्मचाऱ्यांचा अत्यल्प पगार, शक्य नसलेले टार्गेट देऊन मानसिक त्रास व कोणतेही सूचना न देता चार कामगारांना कामावरून काढण्यात आले या सर्व विषयावरून मनसेने वरिष्ठ अधिकाऱ्याना तीन तास धारेवर धरत कामबंद आंदोलनाचा इशारा गुरुवारी प्रयोग शाळेला देण्यात आला. Mns adhikrut
परंतु याची माहिती प्रयोग शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना मिळताच अधिकाऱ्यांनी चंद्रपूर गाठत मनसेचे शिष्टमंडळ व वरिष्ठ अधिकारी यांच्यात शुक्रवारी बैठक पार पडली व तोडगा काढण्याची विनंती प्रयोग शाळेकडून करण्यात आली.
यावेळी कामावरून काढण्यात आलेल्या संपूर्ण कामगारांना कामावर रुजू करून घेण्यात आले तसेच पंधरा दिवसात पगार वाढवून देण्याचे आश्वासन यावेळी कंपनी मार्फत देण्यात आले, यापुढे कंपनीच्या अधिकाऱ्यांना कामगार कोणताही target देण्यात आल्यास कंपनीची मनमानी खपवून घेतली जाणार नाही असा दम त्यांना देण्यात आला.
तसेच संपूर्ण प्रकरणाची माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक याना निवेदनाद्वारे देण्यात आली.
यावेळी महिला सेनेच्या जिल्हाउपाध्यक्ष शोभाताई वाघमारे, मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, तालुकाअध्यक्ष विवेक धोटे, शहर संघटक, मनोज तांबेकर, तुषार येरमे, राज वर्मा, राहुल क्षीरसागर, पियुष धुपे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
