News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात चर्चा करतांना राज्याचे अर्थ नियोजन व वीत्तमंत्री अजित पवार यांनी नियमित पीककर्ज भरणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ५०/- हजाराचे अनुदान एप्रिल महिन्यांमध्ये देण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना दिल्या गेले आहे. When is the subsidy to farmers?ते अनुदान शेतकऱ्यांना केव्हां देणार असा प्रश्न शेतकरी बांधवांनी केला आहे. जिल्ह्यातील व तालुक्यातील शेतकऱ्यांवर लाखो रुपयाचे पिककर्जाचे डोंगर असतांना देखील ३१ मार्च २०२२ च्या आत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाचा खाता क्लीयर ठेवण्यासाठी खाजगी उसनवारीने किंवा सोने गहाण ठेऊन व खाजगी कर्ज काढून भरलेले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेलाच आहे. करिता नियमित पीक कर्ज (Crop debt) भरलेल्या शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या प्रोत्साहन अनुदानाची रक्कम त्वरित शेतकऱ्यांना दिल्यास शेतकरी समाधानी होईल आणि शासनाचे आभारही मानेल. व यावर्षीच्या चालू हंगामाच्या तयारीला लागेल अशी चर्चा शेतकरी बांधवामध्ये केली जात आहे. तेव्हा ५० हजाराचे अनुदान त्वरित द्यावे अशी विनंती सुद्धा केली आहे.
अवकाळी पावसात सापडलेल्या शेतकऱ्यांना कृषिमंत्री यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन हवेत विरले.
मागील नोव्हेंबर २०२१ या महिन्यात आलेल्या अवकाळी पावसाने मुल व सावली तालुक्यातील धान पिकाचे फार मोठे नुकसान केले. सतत पाच सहा दिवस शेतकऱ्यांचे कापलेले धान पाण्यात बुडन राहिल्याने धान लाल झाले त्यामुळे कोणी घायला तयार नाही तोंडात आलेला घास गेला. शेतकऱ्यांचे खरीप पीक हातातून गेले. शेतकरी हवालदिल होऊन खचला. शेतकऱ्यांचे धान बांधितच कोंब निघून वापुन गेले. उत्पन्न अर्ध्यापेक्षाही कमी झाले. जे हाती आले तेही व्यापारी घ्यायला तयार नाही धान लाल पडल्यामुळे आजही शेतकऱ्यांचे धान मातीमोल होऊन घरीच पडले आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अजूनही धान कापणी -बांधणीचे व चुरण्याचे पैसे अजूनही देने बाकी आहे.
आपसी उसनवरीने घेतलेले पैसे देणेच आहे. पैसे कुठून आणावे या विवंचनेत शेतकरी सापडला असतांना सहकारी सोसायटी मधून व सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकामधून हंगामाच्या पूर्वी घेतलेले पीक कर्जाची रक्कम माहे मार्च २०२२ च्या भरणा करावयाचा होता. असा कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांच्या डोक्यावर असतांना केंद्र व राज्य शासनाकडून सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी सुद्धा मुल-सावली-सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून अजूनही नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे एकही पैसे मिळालेले नाही. विधान सभेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही काही झाल्याचे दिसत नाही. कस्टकरी शेतकऱ्यांच्या मागणीकडे सत्ताधारी व विरोधी पक्षनेते लक्ष द्यायला तयार नाही. २०२२ च्या सुरू होणाऱ्या हंगामा करिता पीक कर्ज वाटपाच्या वेळी पीक विम्याची रक्कम कपात केली जाणार असल्याचे सोसायटी कडून सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या पीक विम्याचे व अवकाळी पावसाने नुकसान झालेली नुकसान भरपाई (Compensation) अजूनही दिल्या गेली नाही, आणि देणार किंवा नाही. हे कळायला मार्ग नाही. राज्याचे कृषिमंत्री नाम. दादाजी भुसे यांनी पीक विम्याचे व अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईचे पैसे त्वरित मिळून देऊ असे आश्वासन मुल -सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन दिल्या गेले ते आश्वासन हवेत विरल्या गेल्याचे दिसून येत आहे. असे राज्यकर्ते वागतात म्हणून शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येत असते. याबाबत आतातरी सहानुभूती दाखवून शेतकऱ्यांचा विचार व्हावा. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.