सिंदेवाही - दि 8/4/22 रोज दु 12 वाजता इसरो ह्या बेंगलोर स्थित अवकाश संस्थेचे दोन वैज्ञानिक (Scientist) श्री एम.शाहजहान आणि मयुरेश शेट्टी हे सिंदेवाही येथे 2 एप्रिल ला सिंदेवाही परिसरात पडलेल्या सॅटेलाईट रॉकेट बूस्टर चे अवशेष पाहण्यासाठी आले होते.
स्काय वाच ग्रुप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे हे त्यांचे सोबत माहिती देण्यासाठी उपस्थित होते. (research scientist)
त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेल्या 6 सिलेंडर्स आणि रिंगची पाहणी केली. फ़ोटो आनी व्हिडीओ घेतले आणि लाडबोरी गावाच्या लोकांशी चर्चा केली.
मला दिलेल्या माहिती नुसार हे अवशेष Sattelite Rocket Booster चे असल्याचे त्यांनी सांगीतले. परंतु ह्या सिलेंडर्स मध्ये कोणते इंधन होते ते प्रयोगशाळेच्या तपासणी नंतर सांगता येईल असे सांगितले.
हे अवशेष इसरो च्या कंटेनर मध्ये आजच नेले जाईल. हे अवशेष कुण्या देशाचे आहे, कुणाची जीम्मेदारी आहे हे सांगण्यासाठी त्यानि नकार दिला.एका आठवड्यात ह्यावर संशोधन करून निर्णय दिल्या जाईल असे त्यांनी स्काय वाच ग्रुप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यानि सांगितले. (isro data scientist)
-----//-