News 34 chandrapur
पोंभूर्णा/ घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कंपोस्ट खत निर्मितीचा मोठा गाजावाजा करून ,याची उपयुक्तता पटवून, करोडो रुपये स्वःहा करीत घनकचऱ्याचे कुरण उभारल्या गेले. परंतु हेच कुरण अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमार्फत फस्त केल्या जात असतांना व शेकडो ट्रॅक्टर कंपोस्ट खताची परस्पर विल्हेवाट लावली असतांना ' असं काही घडलंच नाही ' असे लेखी नमुद करणाऱ्या मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांची प्रशासनाप्रती असलेली भुमिका संशयास्पद असुन ,सादर केलेले पुरावे मुख्याधिकारी यांच्या अहवालात प्रथमदर्शनी दिसत असल्याने सदर प्रकरणाची स्वतंत्र यंत्रनेकडून चौकशी करून जनतेच्या पैशातून उभारलेल्या स्वच्छतेच्या कुरणांना फस्त करणाऱ्यांना उघडे पाडण्याकरीता शिवसेना गटनेते आशिष कावटवार यांनी नगरविकास मंत्रालयाकडे मागणी केली असुन, सदर प्रकरण प्रसंगी न्यायालयात नेवून सत्य जनतेसमोर मांडणार अशी भुमिका घेतल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Compost Fertilizer
नगरपंचायतचे नवनियुक्त सत्ताधारी पदाधिकारी पदभार सांभाळताच कंपोस्ट खत गभन करण्याचा प्रथम निर्णय घेऊन स्वतः व स्वकियांना लाभ पोहचवण्याकरीता शेकडो ट्रॅक्टर कंपोस्ट खत एका दिवसात गहाळ केले. (Solid waste management)
या प्रकरणाची तक्रार शिवसेना नगरसेवकांनी विविध यंत्रणा तथा पोलिस विभागाला केली असतांना यावर उत्तरादाखल कुठेही हयगय झाली नसल्याचे लेखी नमुद करून विद्यमान मुख्याधिकारी व सत्ताधारी पदाधिकारी यांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना प्रथमदर्शी बनावटी व खोटी कागदपत्रे पोलिस विभागाला सादर करून असं घडलच नसल्याची लेखी कबूली दिली. यावरून मुख्याधिकारी यांचीच भुमिका संशयास्पद वाटत असुन २०१९ ते २०२२ दरम्यानचे कंपोस्ट खत,घनकचरा व्यवस्थापनातून जमा इतर वस्तू या नगरपंचायत व्यतिरिक्त इतरत्र कुठेही परस्पर ठेकेदाराला विकता येत नसल्याच्या करारनाम्याचा भंग केला आहे. याकरिता स्वच्छ सर्व्हेक्षण टीम २०२२ चे निमित्त समोर केले.
Shivsena
उत्तर दाखल सादर शेतकऱ्याचे प्रमाणपत्र नगराध्यक्षाच्या लेटरहेडवर नगरपंचायत मध्येच तयार करण्यात आले असून यावर तारीख सुध्दा नमुद नाही. तसेच सदर कंपोस्ट खत विनामूल्य न्यावे याकरिता कोणतीही सुचना, मुनादी किंवा जाहिरात नाही. स्वतः व स्वकियांना लाभ पुरवण्याच्या हेतूने रचलेले हे कारस्थान असुन,उघडकीस आल्यावर संपूर्णतः बनावटी कागदपत्रे तयार करून हे प्रकरण झाकण्याचा केविलवाणा प्रकार असुन सन २०१९-२२ या दरम्यान एकही कंपोस्ट खताची बॅग नगरपंचायत मध्ये जमा करण्यात आली नसुन अशी कुठेही स्टाॅकबुक ला नोंद नाही. २०१६ ते २०१९ दरम्यान १५० ते २०० बॅग जमा करण्यात अल्या, त्याच बॅगा पुन्हा दाखवण्यात आल्या. Pombhurna white house
याकरिता सदर प्रकरणात मुख्याधिकारी यांची भुमिका संशयास्पद असुन स्वतंत्र यंत्रनेकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, प्रसंगी न्यायालयातही दाद मागू अशी भुमिका शिवसेना गटनेता नगरसेवक आशिष कावटवार, नगरसेवक गणेश वासलवार, अभिषेक बद्देलवार, बालाजी मेश्राम, रामेश्वरी वासलवार यांनी घेतली असल्याने या बहुचर्चित प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.