News 34 chandrapur
शनिवार - 2 एप्रिल ला सायंकाळी 7.45 वाजता सिंदेवाही परिसरात आकाशात अद्भुत दृश्य (Amazing view of the sky) पाहायला मिळाले. मिसाईल सारखी एक वस्तू पश्चिमे कडुन पुर्वी कडे गेली.त्यांनतर आकाशात थोड्या वेळाने बॉम्ब फुटल्यासारखा आवाज आल्याने लाडबोरी येथील नागरिकांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकांनी स्वतःला घरात बंद करून घेतले.काही काळ लोकांनी या घटनेला,युक्रेन युद्धशी जोडून,रशियाने हल्ला केला (By linking Ukraine to the war, Russia invaded) ,म्हणून अफवा पसरवली, पण नंतर घटनास्थळी जिल्हाप्रशासन आल्याने सर्व अफवांवर ब्रेक लागला.आकाशातून भलीमोठी धातूची तप्त रिंग (Hot metal ring) पडल्याचे स्पष्ट झाले.
लोकांनी स्वतःला घरात बंद करून घेतले.काही काळ लोकांनी या घटनेला,युक्रेन युद्धशी जोडून,रशियाने हल्ला केला (By linking Ukraine to the war, Russia invaded) ,म्हणून अफवा पसरवली, पण नंतर घटनास्थळी जिल्हाप्रशासन आल्याने सर्व अफवांवर ब्रेक लागला.आकाशातून भलीमोठी धातूची तप्त रिंग (Hot metal ring) पडल्याचे स्पष्ट झाले.
पडलेली रिंग पोलिस स्टेशनला जमा केल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
ती रिंग इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे
न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.11 वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेट द्वारे ब्लॅकस्काय (Blacksky) नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत,(2 एप्रिल22) केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने सायंकाळी उत्तर - पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच (Electron rocket booster) असावेत...
आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले.
दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही असा दावा एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला आहे. Sindewahi ladbori village
अवकाशातील ते अवशेष सिंदेवाही तालुक्यात
आरमोरीतही पडले अवशेष
आकाशातून आठ ते दहा मीटर डायमीटर असलेली रिंग सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे पडली.ही रिंग पोलीस स्टेशनला आणून जमा केल्याने निरनिराळ्या चर्चेला विराम मिळाला.असेच अवशेष गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी भागात पडल्याची माहीती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे.
