News34 chandrapur
सिंदेवाही - आकाशातून विशालकाय रिंग सिंदेवाही येथील लाडबोरी गावात पडल्याने एकच खळबळ उडाली असून ते अवशेष बंद पडलेल्या सॅटेलाईटचे असल्याची माहिती आहे परंतु अजूनही खात्रीलायक माहिती मिळाली नाही.सदर अवशेष हा हायड्रोजन टॅंक सारखा दिसत असून त्याचा उपयोग सॅटेलाईट मध्ये उपकरण सिस्टीम सारखा उपयोग केल्या जातो. (Hydrogen tank)
सध्या अभ्यासक यावर संशोधन करीत असून यावर लवकर याबाबत अचूक माहिती पुढे येणार.
ती रिंग इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे
न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.11 वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत, (2 एप्रिल22) केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने सायंकाळी उत्तर - पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच असावेत... (Rocket lab launch schedule)
आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. (Rocket lab electron)
दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही असा दावा एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला आहे
