News 34 chandrapur
चंद्रपूर - 2 एप्रिलला रात्री 8 ते 8.30 वाजताच्या सुमारास आकाशात अनेकांना तारे पडले की काय असा भास झाला मात्र याबाबत चंद्रपुरातील खगोलतज्ञ सुरेश चोपणे यांनी महत्वपूर्ण माहिती देत अफवांना पूर्णविराम दिला. Satellite partरात्रीच्या सुमारास काही वस्तू जोराने पृथ्वीवर येताना दिसल्याने अनेकांनी त्याचे फोटो व व्हिडीओ काढत उल्का स्फोट होणार अश्या अफवा पसरवल्या, मात्र या अफवांना खगोलतज्ञ सुरेश चोपणे यांनी माहिती दिली की पृथ्वी सभोवताल फिरणाऱ्या बंद सॅटेलाईट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण च्या हद्दीत खेचला गेला त्यामुळे त्या सॅटेलाईट चे तुकडे होतं, जळून तो पृथ्वीच्या दिशेने निघाला. Meteor showers
आधी काहींना वाटले की उल्का वर्षाव किंवा सूर्य ग्रहात मोठा स्फोट झाल्याने त्याचे काही भाग पृथ्वीवर पडत आहे. Gravity sky
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात सॅटेलाईट चे काही पार्ट पडले अशी माहिती पुढे येत आहे, घटनास्थळी पोलीस चमू पोहचली असून याबाबत माहिती काढत आहे.


