News 34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील सावरकर नगर येथील उडिया वस्ती मधील नागरिकांना 50 दिवसांच्या आत रेल्वे प्रशासनाने जागा खाली करण्याची नोटीस बजावली आहे. (Railway Department)
मागील 50 वर्षांपासून नागरिक त्या ठिकाणी वास्तव्याला आहे, अचानक रेल्वे विभागाने जागा खाली करण्याचे फरमान काढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मात्र या परिस्थितीत सुद्धा अनेक राजकीय पक्षांनी खोटे आश्वासन देत आम्ही वस्ती हटवू देणार नाही असे आश्वासन दिले. (Mahila congress)
मात्र रेल्वे विभागाला त्याठिकाणी रेल्वे लाईनचे काम सुरू करायचे असल्याने ती जागा नागरिकांना खाली करावीच लागणार आहे, मात्र नागरिकांना त्याठिकानाहून हटविल्यास त्यांच्या पुनर्वसनाचे काय? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला. (Political news)
यावर महिला कांग्रेस व पदाधिकाऱ्यांनी त्याठिकाणी पोहचत नागरिकांना धीर देत आपल्याला या जागेवरून रेल्वे विभागाने हटविल्यास त्यांना घरांच्या बदल्यात घर हवं अशी मागणी सर्वांनी रेटून लावावी असे सांगितले.
महिला कांग्रेसने नागरिकांना सदर बाब सांगताच आम्ही घराची मागणी पूर्ण झाल्याशिवाय ही जागा सोडू अशी भूमिका नागरिकांनी घेतली. Chandrapur news
रेल्वे विभागातर्फे होत असलेल्या या अन्यायाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांच्यासमक्ष सदर बाब ठेवत यावर तोडगा नक्की काढू असे आश्वासन देत, 11 एप्रिलला खासदार धानोरकर यांच्या कार्यालयात रेल्वे विभागातील उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे नागरिकांना आश्वासित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र कांग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, उत्तर भारतीय जिल्हाध्यक्ष राजविर यादव, युवक कांग्रेसच्या प्रवक्त्या ऍड. प्रीती शाह, कांग्रेस सेवादलच्या पूजा आहुजा यांची उपस्थिती होती.